---Advertisement---

सर जडेजाचा ‘पुष्पा’ अवतार पहिला का? फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 9:30 AM
Allu Arjun and Ravindra Jadeja
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे (India tour of South Africa). या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्याच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये. तो दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर आहे. दरम्यान, संघाबाहेर असताना देखील एका विशिष्ठ कारणामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुन (Allu Arjun) याचा ‘पुष्पा’ चित्रपट (Pushpa movie) हा भारतातच नव्हे, तर परदेशातही गाजतोय. या चित्रपटात अल्लू अर्जुनने केलेला अभिनय सर्वांनाच आवडला आहे. तसेच त्याच्या डायलॉगचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशातच भारतीय संघातील सर जडेजा देखील पुष्पा चित्रपटाचा मोठा फॅन झाला आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो (Ravindra Jadeja Instagram post) शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अल्लु अर्जुनचा पुष्पा चित्रपटातील लूक आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रवींद्र जडेजाने हुबेहूब त्याच्यासारखं दिसण्याचा प्रयत्न केला आहे. या लूक मध्ये रवींद्र जडेजा देखील हटके दिसतोय. तसेच चाहते देखील भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

https://www.instagram.com/ravindra.jadeja/p/CYoIXM4MaRD

तसेच हा फोटो शेअर करत त्याने हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्याने या चित्रपटातील डायलॉग ” पुष्पा हे फुल नसून फायर आहे..” असे लिहिले आहे. तसेच पुढे त्याने लिहिले की, “कुठल्याही प्रकारचे तंबाखू सेवन करणे हानिकारक आहे. मी कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाचे समर्थन करत नाही. हे सर्व मी फक्त फोटोसाठी केले आहे. सिगारेट, बिडी आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे कर्करोग होतो आणि त्याचे सेवन करू नका.”

महत्वाच्या बातम्या :

सुट्टी असल्यासारखं वाटतंय’, म्हणत पूर्ण हंगाम बाकावर बसवलेल्या बीबीएल संघाची उन्मुक्तने उडवली खिल्ली

कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल, स्मिथने चँपियन कर्णधार विलियम्सनला पछाडले; तर जेमिसनचीही मोठी झेप

हे नक्की पाहा:

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---