भारतीय संघ इंग्लंड नंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. यामध्ये तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (२२ जुलै) त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. यामध्ये भारतीय संघ वनडे मालिका शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर उपकर्णधार म्हणून रवींद्र जडेजा याची नियुक्ती केली. तर जडेजाबद्दल भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी मोठे वृत्त समोर आले आहे.
भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यास मुकला आहे. तर आता तो दुसऱ्या सामन्यातही खेळणार नाही, हे बीसीसीआयने ट्वीट करत जाहीर केले आहे. त्याची वेस्ट इंडिज विरुद्धची वनडेतील कामगिरी पाहिली असता भारताला त्याची उणीव नक्कीच जाणवणार आहे. तसेच त्याने इंग्लंड दौऱ्यात उत्तम कामगिरी केली आहे.
बीसीसीआयने ट्वीट करत म्हटले, ‘भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात खेळणार नाही. बीसीसीआयचे मेडिकल त्याच्यावर योग्य ते उपचार करत आहेत. तसेच त्याच्या मेडिकल रिपोर्टवरून त्याला तिसऱ्या वनडे सामन्यात खेळवावे की नाही हा निर्णय घेतला जाणार आहे.’
Team India all-rounder Mr. Ravindra Jadeja has sustained an injury to his right knee and has been ruled out of the first two ODIs against West Indies.
The BCCI Medical team is monitoring his progress and a decision on his participation in the third ODI will be taken accordingly.
— BCCI (@BCCI) July 22, 2022
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू-
खेळाडू सामने विकेट्स
१) कपिल देव ४२ ४३
२) अनिल कुंबळे २६ ४१
३) रवींद्र जडेजा २९ ४१
४) मोहम्मद शमी १८ ३७
पोर्ट ऑफ स्पेन येेथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजाच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यर याची निवड केली आहे. तसेच यजमान संघालाही धक्का बसला आहे. या मालिकेतून वनडेमध्ये पुनरागमन करणाऱ्या जेसन होल्डरला कोरोनाची लागण झाल्याने तो पण या सामन्यास मुकला आहे.
या मालिकेत आधीच भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांंना विश्रांती दिली आहेत. त्यातच जडेजाची दुखापत संघासाठी किती महाग पडणार हे कळेलच. भारताच्या संघात युझवेंद्र चहल, अक्षर पटेल हे फिरकीपटू आहेत. हे संघाला त्याची उणीव जाणवणार नाही याची दखल घेत कशी कामगिरी करणार हे पण महत्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सोनियाचा दिनु! इंग्लंडमधील ऐतिहासिक स्टेडियमला दिले जाणार मुंबईकराचे नाव
लॉर्ड्सवर इंग्लंडने ७५ वर्षानंतर जिंकला अॅशेस सामना, ‘हा’ खेळाडू ठरला होता सामन्याचा नायक
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण