---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील २ टी२० सामन्यांतून जडेजा बाहेर; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

On: शुक्रवार, डिसेंबर 4, 2020 11:12 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची अधिकृत घोषणा केली.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सामन्याच्या ब्रेक दरम्यान ड्रेसिंग रूममधील क्लिनिकल मूल्यांकनानुसार जडेजाच्या निदानाची पुष्टी केली. जडेजा निरीक्षणाखाली असून शनिवारी (५ डिसेंबर) सकाळी आवश्यकतेनुसार त्याची पुढील तपासणी केली जाईल. सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेचा तो भाग असणार नाही, असे बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1334909232508911616?s=08

नुकत्याच झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत करत मालिकेची विजयी सुरुवात केली होती. या सामन्यात जडेजाने तुफानी खेळी करत अवघ्या २३ चेंडूत ४४ धावा ठोकल्या होत्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ५ चौकारही मारले होते. या खेळीदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा चेंडू हेल्मेटवर आदळल्याने, तो गोलंदाजीसाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी, कन्कशन सब्टीट्यूट म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर

महत्त्वाच्या बातम्या-

‘बर्फ खांद्यावर काय करतोय, तो तर ग्लासमध्ये पाहिजे’, दोन जडेजांमधील चर्चेचा Video भन्नाट व्हायरल

Video: चेंडू लागला जडेजाच्या हेल्मेटला अन् त्रास झाला ऑस्ट्रेलियाला

‘गब्बर’ धवनची जुनी कमजोरी आली समोर; पाहा Video

ट्रेंडिंग लेख-

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---