भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यातील वाद कुणापासून लपून राहिला नाहीये. एक वेळ होती, जेव्हा मांजरेकरांनी रविंद्र जडेजाला ‘पिट्स ऍन्ड पीस’ क्रिकेटपटू म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर जडेजाने देखील सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले होते. दोघांमधील हा वाद खूप काळ चर्चेत राहिला. असे असले तरी, आता त्यांच्यातील संबंध सुधारताना दिसत आहेत. आता जडेजाने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून मांजरेकरांचा एक खास फोटो शेअर केला आहे.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja ) याने अधिकृत ट्वाटर खात्यावरून संजय मांजरेकर (Sanjay Manjrakar) यांचा हा फोटो शेअर केला आहे. माजी दिग्गज सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये जडेजाने लिहिले की, “मी माझ्या खास मित्राला स्क्रीनवर पाहत आहे.” दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा या दोघांनी एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जडेजाच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
Watching my dear friend on screen @sanjaymanjrekar pic.twitter.com/gU9CnxC9Mx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) September 29, 2022
जडेजाच्या या ट्वीटवर संजय मांजरेकरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती हा फोटो रिट्वीट करत लिहिले की, “हो… हो… आणि तुझा हा खास मित्र तुला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहण्यासाठी इच्छुक आहे.”
Ha ha… and your dear friend looking forward to seeing you on the field soon 🙂 https://t.co/eMpZyZYsYU
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) September 30, 2022
संजय मांजरेकर तसे पाहिले तर समालोचकाच्या भूमिकेत नेहमीच स्पष्ठ भूमिका मांडताना दिसतात. त्यांनी अनेकदा खेळाडूंवर टीक देखील केली आहे. या यादीत जडेजाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते, असे म्हणावे लागेल. मात्र, आता या दोघांचे संबंध सुधारल्याचे दिसते. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2022 मध्येही जडेजा आणि मांजरेकर यांच्यातील मुलाखत चर्चेत राहिली. जडेजाची मुलाखत घेताना मांजरेकरांनी पहिला प्रश्न विचारला की, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार आहे का? जडेजाने देखील त्यांच्या या प्रश्नावर हसत हसत नाही असे उत्तर दिले. त्यानंतर दोघांमध्ये खूप सारी चर्चा झाली.
जडेजा आशिया चषकात चांगल्या फॉर्ममध्यो दिसला होता. आगामी टी-20 विश्वचषकात देखील त्याच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण दुखापतीमुळे तो विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. टी-20 विश्वचषक 16 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून भारताला त्यांचा पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जडेजा आणि मांजरेकरांमधील वाद मिटला! अष्टपैलू खेळाडूने शेअर केली खास पोस्ट
जसप्रीत बुमराहला दुखापत होणार, हे अख्तरला आधीच माहीत होते! जुना व्हिडिओ होतोय व्हायरल