---Advertisement---

जडेजाकडून निघाले पाकिस्तानी फलंदाजाचे रक्त, तत्काळ विचारपूस करणाऱ्या राहुलचे सर्वत्र कौतुक

On: मंगळवार, सप्टेंबर 12, 2023 12:09 AM
Agha Salman bleeding
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने सोमवारी (11 सप्टेंबर) 228 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली या सामन्यात सलामीवीर ठरला, ज्याने संघासाठी शतकी खेळी केली होती. त्याचसोबत केएल राहुल आणि कुलदीप यादव यांनीही सर्वात्तम प्रदर्शन केले. असे असले तरी, सामन्यात पाकिस्तनाच मध्यक्रमातील फलंदाज आगा सलमान चर्चेचा विषय ठरला. सोबत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत केएल राहुल याचे वर्तन देखील कौतुकास्पद ठरत आहे.

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 32 षटकांमध्ये 128 धावा करून सर्वबाद झाला. पाकिस्तान संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खेळपट्टीवर आल्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. संघाची धावसंख्या 47 असताना तीन विकेट्स गेल्या आणि त्यानंतर आघा सलमान () पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सलमाननेही अवघ्या 23 धावा करून विकेट गमावली. पण पाकिस्तान संघासाठी खेळताना आगा सलमानचे रक्त निघाल्यामुळे त्याची चर्चा अधिक झाला.

पाकिस्तानच्या वावातील 21व्या षटकात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी आला होता. जडेजाने या षटकातील शेवटचा चेंडू टाकला आणि तो फलंदाजाच्या चेहऱ्यावर जाऊन लागला. समोर फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे सलमानने हेलमेट घातले नव्हते, जे त्याचा चांगलेच महागात पडले. पाकिस्तानी फलंदाजाच्या डोळ्याजवळ हा चेंडू लागल्यानंतर यष्टीरक्षक केएल राहुलने तत्काळ त्याची चौकशी केली. तितक्यात चेंडू लागलेल्या जागेवरून रक्त देखील आले. पाकिस्तान संघाच्या फिजिओंनी तत्काळ मैदानात धाव घेतली आणि फलंदाजला बँडेज केले. (Nice gesture from Rahul to check Salman soon after the ball hit his face.)

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1701273914213912814?s=20

https://twitter.com/Abdullah__Neaz/status/1701281233538539879?s=20

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1701274031591399714?s=20

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी विराट कोहली याने 122*, तर केएल राहुल याने 111* धावा कुटल्या. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव याने 8 षटकांमध्ये 25 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. परिणामी पाकिस्तान संघ अवघ्या 128 धावांवर गुंडाळला गेला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs PAK । जगातील नंबर एकच्या फलंदाजाने हार्दिक पंड्यापुढे टेकले गुडघे, उडाला त्रिफळा
भारताचा सर्वात मोठा विजय! कुलदीपपुढे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली पाकिस्तानची फलंदाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---