---Advertisement---

रविंद्र जडेजाने घेतलेला शतकातील सर्वोत्तम एकहाती झेल पाहिला का?

---Advertisement---

क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना 7 धावांनी पिछाडीवर रहावे लागले आहे. या डावात भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेण्याबरोबरच क्षेत्ररक्षण करतानाही नील वॅगनरचा एकहाती शानदार झेल घेतला.

झाले असे की जडेजाने कॉलिन डी ग्रँडहोमला त्रिफळाचीत केल्यानंतर फलंदाजीला आलेल्या वॅगनरने काईल जेमिसनला चांगली साथ देताना 9 व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण अखेर मोहम्मद शमीने गोलंदाजी केलेल्या 72 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॅगनरने पूल शॉट मारला.

पण याचवेळी डिप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने वर उडी मारत डावा हात उंचावत अफलातून झेल घेतला. त्यामुळे वॅगनरला 21 धावांवर त्याची विकेट गमवावी लागली. तसेच यामुळे त्याची आणि जेमिसनची 51 धावांची भागीदारीही तुटली.

https://twitter.com/biharibabua_/status/1233990673910697986

जडेजाने हा झेल घेतला त्यावेळी समालोचन करत असलेले इयान स्मिथ म्हणाले, ‘क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेलांपैकी हा एक झेल आहे.’

त्याचबरोबर न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर जडेजाला या झेलबद्दल विचारण्यात आले तेव्हा जडेजा म्हणाला, ‘मी अपेक्षा केली होती की तो (वॅगनर) डिप स्क्वेअर लेगला धावा करेल. पण मी चेंडू तिथे येईल अशी अपेक्षा केली नव्हती. हवेमुळे चेंडू इतका लवकर आला आणि मी लगेचच माझा हात उंचावला. मी जेव्हा झेल तेव्हा मलाही कळाले नाही. आम्ही गोलंदाजी करताना चांगली सांघिक कामगिरी केली. आम्ही आता चांगली फलंदाजी करण्याचा आणि नंतर पून्हा त्यांना सर्वबाद करण्याचा प्रयत्न करु.’

https://twitter.com/Wrongun8/status/1233989451036184576

या डावात न्यूझीलंडकडून जेमिसनने 49 धावांची खेळी केली. तर सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमने अर्धशतकी खेळी करताना 52 धावा केल्या. याव्यतिरिक्त मात्र न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. तसेच जडेजाने 2 विकेट्स आणि उमेश यादवने 1 विकेट घेतली.

https://twitter.com/Maha_Sports/status/1233975098488631296

https://twitter.com/Maha_Sports/status/1233974897451393025

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---