---Advertisement---

फ्लॉप ठरत असलेल्या विराटला तोंडावर बोलला मॅक्सवेल; म्हणाला, ‘आता मी तुझ्यासोबत बॅटिंग नाही करू शकत’

On: गुरूवार, मे 5, 2022 3:05 PM
Glenn-Maxwell-And-Virat-Kohli
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हा हंगाम आतापर्यंत सर्वात वाईट कोणासाठी ठरला असेल, तर तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि विराट कोहली यांच्यासाठी होय. चेन्नई आणि मुंबई हे आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. चेन्नईने ४ वेळा, तर मुंबईने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मात्र, यंदाच्या हंगामात ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, विराटबद्दल बोलायचं झालं, तर तो सपशेल फ्लॉप ठरत आहे. त्याला आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडण्यात हवे तसे यश मिळताना दिसत नाहीये. विराटचा फॉर्म आख्ख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अशातच संघाचा अष्टपैलू आणि विराटचा संघसहकारी ग्लेन मॅक्सवेलने मोठे वक्तव्य केले आहे.

विराटसोबत फलंदाजी करू शकत नाही
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या युट्यूब चॅलेलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) संघसहकाऱ्यांसोबत चर्चा करताना दिसत आहे. यादरम्यान विराटही मॅक्सवेलसोबत या व्हिडिओत दिसत आहे. सामन्यात मॅक्सवेल विराट कोहलीमुळे (Virat Kohli) धावबाद झाला होता. त्यानंतर त्याने विराटबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

मॅक्सवेल मजेत म्हणाला की, “मी आता तुझ्यासोबत कधीच फलंदाजी करू शकत नाही. तू खूप वेगाने धावतो. तुला एक-दोन धावा सहजरीत्या मिळतात, पण मला नाही.” मागील सामन्यात जेव्हा मॅक्सवेल फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला होता, तेव्हा त्याने गोलंदाजीतून कमाल केली होती. त्याने चेन्नईच्या २ महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले होते.

https://twitter.com/RCBTweets/status/1522055986738987009

विराटची बॅट आहे शांत
विराट कोहलीसाठी आयपीएल २०२२खूपच खराब जात आहे. कधीकाळी शतके झळकावणारा विराट यंदाच्या हंगामात ११ सामन्यात फक्त २१६ धावाच करू शकला आहे. त्याच्या बॅटमधून फक्त १ अर्धशतक निघाले आहे. दुसरीकडे पॉवरप्लेमध्ये विराटला खूप वेगाने खेळता येत नाहीये.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सीएसके के खिलाफ जीती आरसीबी
आयपीएल २०२२च्या ४९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) १३ धावांनी पराभूत केले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना बेंगलोरने ८ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. यावेळी आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाला ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या. बेंगलोरकडून यावेळी महिपाल लोमरोरने फलंदाजी करताना सर्वाधिक ४२ धावा केल्या. तसेच, गोलंदाजीत हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

सामनावीर पुरस्कार पटकावूनही हर्षल पटेल स्वत:शीच का नाहीये खुश? म्हणाला, ‘तुम्हाला भान असावे लागते’

लज्जास्पद! एमएस धोनी बाद होताच विराटने दिली शिवी? कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

एमएस धोनीमुळेच चेन्नई प्लेऑफमधून गेली बाहेर? ‘या’ खेळाडूला बाहेर करणं पडलं महागात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---