रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी (०४ मे) आयपीएल २०२२चा ४९ सामना झाला. उभय संघांनी चालू हंगामात आमने सामने येण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी चेन्नईने बेंगलोरला पराभूत केले. आता बेंगलोरने मागील पराभवाचा वचपा काढत चेन्नईला १३ धावांनी पराभूत केले आहे. हा त्यांचा हंगामातील सहावा विजय होता.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात (RCB vs CSK) प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघाला २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या आणि बेंगलोरने हा सामना खिशात (RCB Beats CSK) घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महिपाल लोमरोरची ताबडतोब खेळी
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोर संघाकडून महिपाल लोमरोर (Mahipal Lomror) याने सर्वाधिक धावा केल्या. २७ चेंडू खेळताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ४७ धावांची उपयुक्त आणि ताबडतोब खेळी केली. त्याच्याखेरीज कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३८ धावांचे योगदान दिले. तसेच विराट कोहलीने ३० धावांची संथ खेळी केली. यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनेही शेवटच्या षटकात फलंदाजीला येत नाबाद २६ धावा जोडल्या.
https://twitter.com/IPL/status/1521906157530804224?s=20&t=uu580uSh2LSamZ5F6vH0VA
या डावात चेन्नईच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. महिश तिक्षिणाने ४ षटके फेकताना २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोईन अलीने २ विकेट्स काढल्या. ड्वेन प्रिटोरियसनेही एका विकेटचे योगदान दिले.
हर्षल पटेलपुढे चेन्नईची फलंदाजी फळी ढासळली
बेंगलोरच्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून डेवॉन कॉन्वेने धुव्वादार अर्धशतक केले. ३७ चेंडू खेळताना २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ५६ धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. मोईन अली ३४ धावा करून बाद झाला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडनेही २८ धावा जोडल्या. कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) तर २ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांनाही विशेष योगदान देता आले नाही.
https://twitter.com/IPL/status/1521911551825178624?s=20&t=uu580uSh2LSamZ5F6vH0VA
या डावात बेंगलोरकडून हर्षल पटेल (Harshal Patel) याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना संघाला महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या ३ विकेट्स मिळवून दिल्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलने २, शाहबाज अहमद, जोश हेजलवुड आणि वानिंदू हसरंगा यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माझा होशील का? चेन्नई-बेंगलोर सामन्यात मुलीने सर्वांसमोर केले मुलाला प्रपोज, Video तुफान Viral
मोईन अलीचा मॅजिक बॉल, बॅट- पॅडच्या मधून जात चेंडूने उडवल्या यष्ट्या; खुद्द विराटही पाहातच राहिला
सीएसकेची वाढली डोकेदुखी! कॅच घेण्याच्या नादात जडेजाने स्वत:लाच केले जखमी, मैदानावर लागला विव्हळू





