---Advertisement---

सनरायझर्स हैदाराबादविरुद्ध देवदत्त पड्डीकल खेळणार का नाही? प्रशिक्षक माईक हेसनने दिले उत्तर

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 5:21 PM
Devdutta Padikkal and Virat Kohli
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने मुंबई इंडियन्स संघाचा २ गडी राखून पराभव केला. त्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाची क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही विभागातील कामगिरी वाखणण्याजोगी राहिली होती. यानंतर बुधवार, दिनांक १४ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा सामना सनरायझर्स हैद्राबाद संघासोबत होणार आहे.

पहिल्या सामन्यात बंगळूरु संघाकडून देवदत्त पड्डीकल हा खेळला नसला, तरी हैद्राबाद संघाच्या विरोधात होणाऱ्या सामन्यात तो खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी याबाबत माहिती दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “पड्डीकल पुनरागमन करत असून तो पूर्ण तंदुरुस्त पण आहे. तो हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी खेळायला उपलब्ध होणार आहे.”

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पड्डीकलच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर खेळला होता. सलामी जोडी म्हणून बंगळूरु संघाकडून विराट कोहली आणि सुंदर दोघांनी सामन्याला सुरुवात केली होती. पण त्या सामन्यात सुंदरला चांगली फलंदाजी करता नव्हती. वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूमध्ये १० धावा करून तो बाद झाला होता.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या ऐवजी देवदत्त पड्डीकल सलामीला खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये थोडेफार बदल केले जाणार असून खेळपट्टी पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे माईक हेसन यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पड्डीकलचे पुनरागमन तर विलियम्सनची अनुपस्थिती, ‘अशी’ असेल RCB आणि SRH ची प्लेइंग इलेव्हन?

धक्कादायक! माजी कर्णधार हिथ स्ट्रिकवर आयसीसीने घातली तब्बल ८ वर्षांची बंदी, लावण्यात आले ‘हे’ ५ आरोप

‘या’ खेळाडूची निवड करुन मुंबई इंडियन्सने मोठी चुक केली, माजी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---