सोमवारी (दि. 29 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. हा सामना चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने जिंकला आणि पाचव्यांदा किताब आपल्या नावावर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये अनेक नवनवे विक्रम रचले गेले. फलंदाजीमध्ये अनुभवी तसेच युवा खेळाडूंनी आपली वेगळी छाप पाडली. त्याचवेळी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस व विराट कोहली या जोडीने एक खास पराक्रम नोंदवला.
आयपीएल 2023 मध्ये आरसीबीची कामगिरी अपेक्षित प्रमाणे राहिली नाही. त्यांचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिला. असे असले तरी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस व विराट कोहली या सलामी जोडीने एकहाती संघाची धुरा वाहिली. या दोघांनी 14 सामन्यांमध्ये 939 धावा जोडल्या. यापूर्वी विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स या जोडीने 2016 आयपीएल हंगामात एकत्रितपणे 939 धावा केल्या होत्या. ही आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम एकत्रित कामगिरी राहिली आहे. विराट व प्लेसिस यांच्यानंतर चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी सर्वाधिक धावा जुळवल्या. त्यांनी या हंगामात 849 धावा काढल्या. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टोने 2019 मध्ये 791 धावा केलेल्या.
विराट व प्लेसिस यांच्या या हंगामातील वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास प्लेसिसने 14 सामन्यांमध्ये 56.14 च्या सरासरीने 730 धावा केल्या. साखळी फेरी समाप्त होईपर्यंत तो ऑरेंज कॅप शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होता. दुसरीकडे विराटने 53 पेक्षा जास्तच्या सरासरीने 639 धावा केल्या. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत झाल्याने आरसीबीला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.
(RCB Openers Faf Du Plessis And Virat Kohli Scored Most Runs As Partnership In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका
सीएसकेच्या यशामागील खरा चाणक्य! 16 वर्षांपासून सुपर किंग्सला वाट दाखवणारा ‘सुपर कोच’ फ्लेमिंग