रविवारी (21 मे) आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचे अखेरचे दोन सामने खेळले जातील. पहिला सामना मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघात सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. मात्र, आरसीबीच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशेवर पाऊस पाणी फेरू शकतो.
हंगामातील अखेरचा साखळी सामना असला तरी प्ले ऑफच्या एका जागेची निवड होणे बाकी आहे. रविवारच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यास त्यांचे सोळा गुण होतील. त्यानंतर अखेरच्या सामन्यात आरसीबीला विजय मिळवणे अनिवार्य आहे.
मात्र, मागील दोन दिवसांपासून बेंगलोरमधील हवामान पाहिल्यास पाऊस मोठी भूमिका बजावू शकतो. शनिवारी बेंगलोर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर रविवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण तसेच पाऊस पडलेला आहे. सायंकाळी देखील पावसाची शक्यता वर्तवली गेलीये.
गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या गुजरातला पराभूत करून चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आरसीबीकडे आहे. मात्र, हा सामना पावसामुळे अपूर्ण राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. त्यानंतर आरसीबीची गुणसंख्या 15 होईल. अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात मुंबई विजयी झाल्यास ते 16 गुणांसह प्ले ऑफ्ससाठी पात्र होतील. मुंबईला पराभव पहावा लागल्यास 15 गुण मिळवत आरसीबी एलिमिनेटरमध्ये दाखल होईल.
तत्पूर्वी, शनिवारी स्पर्धेतील पहिले तीन संघ निश्चित झाले. गुजरात टायटन्सनंतर चेन्नई सुपर किंग्स व लखनऊ सुपरजायंट्स यांनी विजय संपादन करत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पहिला क्वालिफायर सामना गुजरात विरुद्ध चेन्नई असा होईल. त्यानंतर एलिमिनेटर व दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होईल.
(RCB Play Offs Equation Depends On Rain RCBvGT IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना झालेल्या वादात 12 वर्षीय चिमुकल्याची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
बझबॉलच्या जोरावर इंग्लंड ऍशेस जिंकणार? ऑस्ट्रेलियन संघाला अँडरनसचे खुले आव्हान