---Advertisement---

आरसीबीचा 2025 मधील स्वप्नवत प्रवास! विक्रमी कामगिरीतून ट्रॉफीकडे मजबूत पावलं

---Advertisement---

आयपीएल 2025 IPL 2025 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करत आपला जुन्या अपयशांचा इतिहास मोडून काढला आहे. या हंगामात RCB ने अनेक विक्रम रचले, जुने आकडे फोडले आणि एक नवा आत्मविश्वास दाखवला.

आरसीबीची आयपीएल 2025 मधील आत्तापर्यंतची कामगिरी RCB PERFORMANCE SO FAR IPL 2025

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग (228 धावा) यशस्वी केला
9 वर्षांनंतर पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये स्थान
17 वर्षांनंतर सीएसकेला चेपाॅकवर हरवले
10 वर्षांनंतर वानखेडेवरवर मुंबई विरुद्ध विजय
7 वर्षांनंतर दिल्लीच्या मैदानावर दिल्ली विरुद्ध विजय
6 वर्षांनंतर केकेआर विरुद्ध ईडन गार्डनवर विजय
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सीएसके विरुद्ध दोन्ही लीग सामने जिंकले
लीग स्टेजमध्ये सर्वच ‘अवे’ (घराबाहेरील) सामने जिंकणारी पहिली टीम बनली
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा, एका टीमकडून 10 वेगवेगळ्या खेळाडूंनी 50+ धावा केल्या
पहिल्यांदाच, आरसीबीचे 8 वेगवेगळे खेळाडू एका सिझनमध्ये सामनावीर (Man of the Match) पुरस्काराचे मानकरी ठरले

या सगळ्या घडामोडींनी आरसीबीचे यंदाचे पर्व अधिकच रोमांचक आणि आशादायी ठरले आहे. संघाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही विभागांतील संतुलित कामगिरीमुळे, आरसीबी यंदा खऱ्या अर्थाने आयपीएल ट्रॉफीच्या प्रबळ दावेदारांपैकी एक बनला आहे.

आज, 29 मे 2025 रोजी, IPL 2025 चा क्वालिफायर 1 सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता (IST) मुल्लांपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---