---Advertisement---

RCB vs GT: टायटन्सचा 92 धावांनी पराभव करत डिफेडिंग चॅम्पियन आरसीबीचा IPL 2026 स्पर्धेच्या फायनलमध्ये दणक्यात प्रवेश

On: बुधवार, मे 27, 2026 12:09 AM
---Advertisement---

आयपीएल 2026 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) संघात आज धर्मशाला स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातचा 92 धावांनी पराभव करत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (RCB into the finals) या सामन्यात कर्णधार गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते.

आरसीबीने फलंदाजी करताना एकूण 254 धावा केल्या. आरसीबीसाठी सर्वाधिक कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 93 धावांची शानदार खेळी केली ज्यामध्ये 9 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. याचबरोबर कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 43 धावांची खेळी केली.

या विजयाबरोबरच आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच गुजरात टायटन्सला उद्या जिंकणाऱ्या संघासोबत एलिमिनेटर सामना खेळावा लागेल, त्यानंतर जो संघ जिंकेल तो आरसीबीसोबत फायनल सामना खेळेल. आयपीएल 2026 स्पर्धेचा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मे रोजी खेळला जाणार आहे.

या विजयासह आरसीबीने पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याही वर्षी ते फायनलचं विजेतेपद राखण्यात यशस्वी होतील का याकडे संपूर्ण क्रिकेट
चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---