आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे संघ आमनेसामने येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. पॉईंट्स टेबल मध्ये दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये हा सामना होणार असल्याने चुरशीच्या लढतीची चाहत्यांना अपेक्षा असेल.
दिल्लीने मागील सामन्यात सनरायझर्स हैद्राबादला सुपर ओव्हर मध्ये मात दिली होती. तर आरसीबीला मात्र चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दिल्ली या सामन्यात आपला विजयी सिलसिला जारी राखण्याचा प्रयत्न करेल तर आरसीबी पराभव विसरून पुन्हा विजय पथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. जाणून घेऊया या सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल.
दिल्ली कॅपिटल्स –
दिल्लीच्या संघाला या सामन्यात एक बदल करणे अनिवार्य असेल. कारण त्यांचा ऑफस्पिनर आर अश्विनने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्या जागी ललित यादवला संधी देण्याचा विचार दिल्लीचे संघ व्यवस्थापन करू शकते. ललित यादव फलंदाज असून तो उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी देखील करू शकतो. या व्यतिरिक्त विजयी संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
दिल्लीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिम्रॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, आवेश खान
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर –
आरसीबीची विजय घौडदौड चेन्नईने मागील सामन्यात रोखली. या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजीत खोली नसल्याची उणीव स्पष्ट दिसून आली. त्यामुळे फलंदाजी मजबूत करण्यासाठी या सामन्यात शाहबाज अहमद किंवा रजत पट्टीदारला संघात संधी मिळू शकते. तसेच अष्टपैलू डॅनियल ख्रिस्टियन विशेष प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला होता. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सला संधी मिळू शकते.
आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
विराट कोहली, देवदत्त पड्डीकल, रजत पट्टीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम्स, कायले जेमिसन, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज
महत्वाच्या बातम्या:
आरसीबीविरूद्ध दिल्लीला भासणार या खेळाडूची कमतरता
कोरोना लसीकरणाबाबत बीसीसीआयची दुटप्पी भूमिका, भारतीयांना लस देणार तर परदेशी खेळाडू
येस बॉय, पृथ्वी शॉची धमाकेदार खेळी पाहून गर्लफ्रेंड अति आनंदित; केलं तोंडभरुन कौतुक






