IPL 2025; आयपीएल 2025 मधील लीग टप्पा मंगळवारी संपला असून, प्लेऑफ सामने उद्या म्हणजेच 29 मे पासून सुरू होतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 6 विकेट्सने पराभव करत क्वालिफायर-1 साठी आपले स्थान निश्चित केले आहे. Rcb Beat Lsg क्वालिफायर-1 मध्ये त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे.
या सामन्यात जितेश शर्माने जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. केवळ 33 चेंडूत 85 धावा करणाऱ्या जितेशला सामनावीराचा किताब देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना जितेश शर्मा म्हणाला, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी असं खेळ प्रदर्शन केले आहे. विराट सर बाद झाल्यानंतर मी सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, ज्यात मला यश मिळाले. दबावाचा मला आनंद वाटला.” Jitesh Sharma Reaction
जितेशने पुढे सांगितले, “दिनेश कार्तिक सरांनी मला सांगितले की जर मी सामना अखेरपर्यंत नेला तर मला संघाला विजय मिळवून देण्याची ताकद आहे. मी सध्या या क्षणाचा आनंद घेत आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय आणि जितेश शर्माचा खेळ संघासाठी मोठी प्रेरणा ठरला आहे. आता संघाचा फोकस क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध सामना जिंकण्यावर आहे. RCB vs PBKS Qualifier-1 IPL 2025
85 धावांच्या नाबाद खेळीसह, जितेश शर्माने एमएस धोनीचा 7 वर्षे जुना विक्रमही मोडला. जितेश आता आयपीएलच्या इतिहासात सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता, ज्याने 2018 च्या हंगामात आरसीबी विरुद्धच्या सामन्यात 34 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.