इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते आतापर्यंत त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच विराटच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
झाले असे की, नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सने (Punjab Kings) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आयपीएल १५मधील बेंगलोर संघाचा हा पहिलाच पहिलाच सामना होता. या वेळी विराटने (Virat Kohli) मैदानावर पाऊल ठेवताच एक खास कामगिरी केली. विराटने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील २०० डाव पूर्ण केले.
विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९९ डावांमध्ये फलंदाजी केली होती. यादरम्यान त्याने ३७.४०च्या सरासरीने १२९.९५च्या स्ट्राईक रेटने ६२८३ धावा केल्या होत्या. विराट आयपीएलमध्ये आतापर्यंत २०८ सामने खेळला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या एमएस धोनी (२२१), रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक (२१४) या खेळाडूंच्या मागे आहे.
आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून खेळणार विराट
विराटने आयपीएल २०२१दरम्यान बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडले होते. या हंगामात तो फक्त् फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. बेंगलोर संघाने फाफ डू प्लेसिसला संघाचा कर्णधार बनवले आहे. डू प्लेसिस यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. मात्र, यावेळी त्याच्या खांद्यावर बेंगलोर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. आता तो या हंगामात बेंगलोरला आयपीएलचा किताब जिंकून देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
अर्रर्र! मागील १० हंगामांपासून मुंबई इंडियन्स ‘या’ गोष्टीत ठरतोय फ्लॉप; वाचून तुम्हालाही बसेल शॉक






