आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) संघामध्ये सामना खेळला जाणार आहे. पावसाचा अंदाज बघता हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. आरसीबीचा प्रयत्न असेल की, हा सामना जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचणे. तसेच सनरायझर्स हैदराबाद आरसीबीचा पराभव करण्याचा हेतूनेच मैदानात उतरेल. सनरायझर्स हैदराबाद संघाचा सफर याआधीच संपला आहे, परंतु आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील हे टू हेड रेकॉर्ड कसं आहे जाणून घेऊया.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबी आणि हैदराबाद आमने-सामने सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघात 25 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 11 वेळा आरसीबीने तसेच 13 वेळा हैदराबादने बाजी मारली आहे.
हे रेकॉर्ड बघितल्यास म्हटले जाऊ शकते की, या आकड्यांमध्ये हैदराबादचा पारड थोडसं जडं दिसून येत आहे. दोन्ही संघांमध्ये नेहमीच टक्कर पाहायला मिळाली आहे. पुढच्या हंगामात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, आरसीबी हे आकडे कमी करेल का?
दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
आरसीबी: फिल साल्ट (यष्टीरक्षक), विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एंगीडी
हैदराबाद: पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, हर्षल पटेल, जीशन अंसारी, जयदेव उनादकट






