---Advertisement---

RCB vs SRH: चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? पिच रिपोर्ट जाणून घ्या!

On: शनिवार, मार्च 28, 2026 6:41 AM
---Advertisement---

आज, शनिवार 28 मार्च रोजी आरसीबी आणि एसआरएच यांच्यात आयपीएल 2026 मधील पहिला सामना रंगणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार असून, हा आरसीबीचा होम ग्राउंड आहे. मात्र, गेल्या वर्षी विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे या मैदानावर यंदा मर्यादित सामनेच आयोजित करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यंदा ओपनिंग सेरेमनी देखील रद्द करण्यात आली आहे.

पिच रिपोर्टबद्दल बोलायचे झाल्यास, चिन्नास्वामीची विकेट पारंपरिकपणे फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. जवळपास एक वर्ष येथे सामना झाला नसला तरी पिचमध्ये फारसा बदल झालेला नाही. लहान बाउंड्री आणि सपाट विकेट यामुळे मोठे स्कोअर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आजचा सामना हाय-स्कोरिंग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॉस जिंकणारी टीम प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे तुलनेने सोपे मानले जाते. तसेच रात्रीच्या वेळी दवाचा परिणामही दिसून येतो. या मैदानावर 220 पेक्षा जास्त धावा केल्यास तो चांगला टोटल मानला जातो.

चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएल आकडेवारीही याची पुष्टी करते. येथे आतापर्यंत 100 सामने खेळले गेले असून, त्यापैकी 53 सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 43 सामने जिंकले आहेत. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 287/3 इतकी असून, सरासरी धावगती प्रति षटक 8.82 आहे.

दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीकडे पाहिले असता, एकूण 25 सामन्यांमध्ये हैदराबादने 13 तर बेंगळुरूने 12 सामने जिंकले आहेत. मात्र, मागील 5 सामन्यांमध्ये आरसीबीने 3 वेळा बाजी मारली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---