---Advertisement---

RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत RCB चा वानखेडे स्टेडियमवर शानदार विजय

On: सोमवार, एप्रिल 7, 2025 11:43 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेमधील 20वा सामना आज (07 एप्रिल) खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई संघाचा घरेलु मैदानावर 12 धावांनी पराभव केला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.

बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 5 खेळाडू गमवून 221 धावा केल्या. आणि मुंबईला जिंकण्यासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. पण धावांचा पाठलाग करताना मुंबई संघ 209 धावा करू शकला. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा तिलक वर्माने केल्या. त्याने 29 चेंडूत 56 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकार झळकावले. तसेच हार्दिक पांड्याने 42 धावा केल्या, त्याने 3 चौकार व 4 षटकार झळकावले. तसेच सूर्यकुमारने 28 धावा आणि विल जॅक्सने 22 धावा केल्या. रोहित शर्मा काही खास कामगिरी करू शकला नाही.

बंगळुरू संघासाठी सर्वाधिक विकेट्स कृणाल पांड्याने घेतल्या. त्याने 4 षटकात 45 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच यश दयाल आणि जोश हेजलवोड यांनी 2- 2 विकेट्स घेतल्या.

बंगळुरू संघासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या. त्याने 42 चेंडूत 67 धावा केल्या. त्यादरम्यान 8 चौकार तर 2 षटकार झळकावले. कर्णधार पाटीदारने 32 चेंडूत 64 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 4 षटकार झळकावले. तसेच देवदत्त पडिकलने 37 धावा, तर जितेश शर्माने 40 धावा केल्या.

तसेच मुंबईसाठी ट्रेंट बोल्टने 4 षटकात 57 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच कर्णधार हार्दिक पांड्याने 4 विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथुरने देखील 1 विकेट घेतली.
मुंबईला आज हंगामात पहिल्यांदा घरेलु मैदानावर पराभूत व्हावे लागले आहे.तसेच 2015 नंतर आरसीबीने पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---