मंगळवारी (२१ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा ३९वा सामना झाला. हा सामना बेंगलोरने ३९ चेंडू राखून ८ विकेट्स जिंकला. हा बेंगलोरचा हंगामातील ७वा सामना होता. यासह त्यांनी गुणतालिकेत दूसरे स्थान पटकावले आहे. तर कोलकाता संघ चौथ्या स्थानावर कायम आहे.
कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात ८ विकेट्सच्या नुसकानावर फक्त ८४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बेंगलोरने १३.३ षटाकतच २ विकेट्स गमावत कोलकाताचे आव्हान पूर्ण केले आणि विजयाची पताका झळकावली.
बेंगलोरकडून फलंदाजी करताना सलमीवीर फलंदाज देवदत्त पड्डीकलने १७ चेंडूत सर्वाधिक २५ धावा केल्या. पण गुरकिरत मान आणि त्याच्यात धाव घेताना गोंधळ झाल्यामुळे तो ६.४ षटकात धावबाद झाला. पड्डीकलव्यतिरिक्त संघाच्या विजयात गुरकिरतने नाबाद २१ धावा, कर्णधार विराट कोहलीने नाबाद १८ धावा आणि ऍरॉन फिंचने १६ धावांचे योगदान दिले.
कोलकाताकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने ४ षटकात १७ धावांवर एक विकेट घेतली. इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
तत्पुर्वी कोलकाताकडून प्रथम फलंदाजी करताना कुणालाही जास्त विशेष प्रदर्शन करता आले नाही. कर्णधार ओएन मॉर्गनने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर लॉकी फर्ग्युसनने १९ धावा कुलदिप यादवने १२ धावांची कामगिरी केली. तर बेंगलोरकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने ४ षटकात ८ धावा घेत ३ विकेट्स चटकावल्या. त्याने २ षटके निर्धावही टाकली.
तसेच युझवेंद्र चहलने ४ षटकात १५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. नवदिप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदरनेही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
व्हिसा मिळूनही झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत संघासोबत गेले नाही पाकिस्तानला, जाणून घ्या कारण
शतक ठोकले पण इतिहास रचलाय हे माहिती नव्हतं, सामन्यानंतर धवनचे अचंबित करणारं वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू