आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा चाहतावर्ग मोठा आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जप्रमाणेच आरसीबीचे चाहते देखील त्यांच्या संघासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतात. पण याच संघासाठी एक वाईट बातमी सध्या समोर येत आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या आरसीबीचे ट्वीटर खाते हॅक केले गेले आहे. आरसीबीसोबत असे काही घडण्याची ही पहिलीच नाही, तर तिसरी वेळ आहे.
मागच्या तीन वर्षांत आयसीबी () संघावर अशा प्रकारचा हा तिसरा प्रकार घडला आहे. यावेळी हॅकर्सने आरसीबीचे अधिकृत ट्वीटर खाते हॅक केले आहे. यापूर्वी 2021 मध्ये देखील त्यांचे ट्वीटर खाते अशाप्रकारे हॅक केले गेले होते. तर 2022 मध्ये आरसीबीच्या यूट्यूब खात्यासोबत हॅकर्सकडून असे प्रयत्न केले गेले होते. यावेळी हॅकर्सने आरसीबीच्या ट्वीटर खात्याचे थेट नावच बदलल्याने हे प्रकरण मागच्या वेळीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे दिसते. फ्रँचायझीने याविषयी एक निवेदन जारी करत सविस्तर माहिती दिली आहे.
हॅकर्सने आरसीबीच्या ट्वीटर खात्याचे नाव बदलून ‘बोरड एप यॉट क्लब’ असे केले आहे. एवढेच नाही त्यांच्या खात्यावरून हॅकर्स एनएपटी (NFT) म्हणजेच नॉन फंजीबल टोकन विकण्याचा प्रयत्न करत आहेत. आयरीसीने जारी केलेल्या निवेदनात सांगितले गेले आहे की, “21 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजाताच्या आसपास आरसीबीचे ट्वीटर खात्यासोबत छेडछाड करण्यात आली. काही वेळासाठी आम्ही खात्यावरील नंयंत्रण देखील गमावले होते. ट्वीटरने सांगितलेल्या सर्व सुरक्षा उपाय वापरूनही गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. आम्ही आमच्या खात्यावरून आज केल्या गेलेल्या ट्वीट किंवा रिट्वीटचे समर्थन करत नाहीये. चाहत्यांची गैरसोय झाल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही यावर लवकरात लवकर उपाय काडण्यासाठी ट्वीटरच्या सपोर्ट टीमसोबत काम करत आहोत.”
Official statement from RCB about their twitter handle. pic.twitter.com/79Y3giWLub
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2023
आरसीबी आयपीएल 2008 म्हणजे लीगच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. 2009 मध्ये संघाचे ट्वीटर खाते तयार केले गेल. ट्वीटरवर आरसीबीला 6.9 मिलियन फॉलोअर्श आहेत. संघाच्या सोशल मीडिया खात्यावर हॅकिंगच्या वारंवार होणाऱ्या प्रयत्नांवर आता आरसीबी काय उपा करत हे पाहण्यासारखे असेल. दरम्यान, आयपीएलचा आगामी हंगाम देखील आरसीबीसाठी खास अरणार आहे. कारण त्यांचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल 2023 हंगामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. (RCB’s Twitter account has been hacked )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप
विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स