आयपीएल २०२१ स्पर्धेतील ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने १४१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची गोलंदाजी सुरू असताना मोहम्मद सिराजकडून एक मोठी चूक झाली होती, ज्यामुळे विराट कोहलीने संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते.
सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू असताना पावरप्लेच्या षटकात अभिषेक शर्माने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळला, जो सीमारेषेवर असलेल्या मोहम्मद सिराजच्या हातात गेला. चेंडू हवेत असल्याकारणाने मोहम्मद सिराजकडे हा झेल टिपण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या हातून हा झेल सुटला.
मोहम्मद सिराज हा एक अप्रतिम गोलंदाज आहे, यासह तो एक उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. त्यामुळे विराट कोहलीला विश्वास होता की, मोहम्मद सिराज हा झेल टिपणा. परंतु डाईव्ह मारून देखील शेवटच्या क्षणी त्याच्या हातून हा झेल सुटला. हा झेल सुटल्यानंतर कर्णधार विराट कोहली भलताच चिडला होता. त्याचा मैदानावरच मोहम्मद सिराजवर संताप व्यक्त करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
— No caption needed (@jabjabavas) October 6, 2021
सनरायझर्स हैदराबाद संघाचा ४ धावांनी विजय
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉयने ४४ धावांची खेळी केली होती. तर केन विलियमसनने ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटक अखेर ७ बाद १४१ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ४१ तर ग्लेन मॅक्सवेलने ४० धावांचे योगदान दिले. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना या धावा करता आल्या नाही. शेवटी या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी धावबाद करतो’, म्हणत विराटची स्टंप्सकडे धाव; मग झालं असं काही की मॅक्सवेल-चहलने उडवली खिल्ली
डोळ्याचे पाते लवते न लवते इतक्यात डॅनियलचा ‘रॉकेट कॅच’, फलंदाजाच्याही उंचावल्या भुवया- VIDEO
सीएसकेच्या ताफ्यात रोहित शर्माच्या भिडूची एन्ट्री, घेणार दुखापग्रस्त सॅमची जागा; वाचा त्याच्याबद्दल