येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. गतवर्षी युएईमध्ये पार पडलेली आयपीएल २०२० स्पर्धा यंदा भारतातच रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये रंगणार आहे. अशातच सर्व संघ कसून सराव देखील करत आहे. आयपीएलमध्ये एक असा संघ आहे, ज्या संघाला कंजूस आणि लुटेरे असे संबोधले गेले तर काही गैर ठरणार नाही. यामागचे कारणही तितकेच खास आहे.
आयपीएलचे १४ वे सत्र सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच जेतेपद पटकावण्यासाठी सर्व संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहे. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघ गेल्या ४ हंगामापासून प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. तसेच २०१६ मध्ये या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अंतिम फेरीत पराभूत करत, पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते. तेव्हापासून या संघाने मागे वळून पाहिले नाही. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या संघातील खेळाडूंनी देखील संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. या संघाला ‘कंजूस’ म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे, या संघाने प्रथम फलंदाजी करताना कितीही कमी धावा केल्या असल्या; तरीही या संघाचे गोलंदाज त्या धावांचा यशस्वीरीत्या बचाव करू शकतात. यासोबतच संघाला सामना देखील जिंकवून देऊ शकतात. या संघात राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी, विजय शंकर आणि टी नटराजन सारखे स्टार गोलंदाज आहेत. जे विरोधी संघाच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सक्षम आहेतच. यासोबतच या गोलंदाजांची इकॉनॉमी इतर गोलंदाजापेक्षा चांगली आहे.
तसेच या संघातील फलंदाजांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना ‘लूटे’रे म्हणून संबोधले गेले आहे. या संघात सलामी फलंदाजाची भूमिका डेव्हिड वॉर्नर पार पाडतो. तो सलामीला येऊन आक्रमक फलंदाजी करतो. डेव्हिड वॉर्नरने आयपीएल २०२० मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १६ सामन्यात ५४८ धावा केल्या होत्या.
हेच मुख्य कारण आहे की, सनरायजर्स हैदराबाद संघाने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यांनतर सलग ४ हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. अशीच कामगिरी त्यांनी या हंगामात केली तर सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२१ स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
नवख्या शिलेदाराने मिळवलं कुंबळेंच्या मनात स्थान; म्हणाले, ‘तो मला पोलार्डची आठवण करुन देतो’
शेळीपालन ते शिक्षकाची नोकरी; वयाची तिशी पार केलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा प्रवास वाचून पाणावतील डोळे
फेक फिल्डिंगने हुकवलं फखर जमानचं द्विशतक, पाकिस्तानी दिग्गजाने क्विंटन डीकॉकला सुनावली खरीखोटी






