क्रिस्तियानो रोनाल्डोची जागा तोटेनहॅम हॉटस्परचा स्ट्रायकर हॅरी केनने घ्यावी असे रियल माद्रिदच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
स्पेनमध्ये घेतलेल्या सर्वेमध्ये २१व्या फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट जिंकणाऱ्या केनला २००,०००मधून २६%मते मिळाली तर पॅरीस-सेंट जर्मनचा एडिसन कवानी आणि एसी मिलॅनचा मौरो कार्डी या दोघांना मिळून १४% मते मिळाली आहेत.
बायर्न म्युनिचचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवाडोस्की आणि लायोनचा मारियानो लोपेज या दोघांना १२% मिळाली. यामध्ये पॅरीस-सेंट जर्मनचे स्टार फॉरवर्ड्स कायलिन एमबाप्पे आणि नेमार यांचा समावेश नव्हता.
चेलसाचा एडन हॅझार्ड हा रियलसोबत ट्रान्सफर विंडोमध्ये खूप आधीपासून जोडला गेला आहे. पण याचाही त्या सर्वेमध्ये समावेश नव्हता.
पाच वेळेचा बॅलोन डी’ओर पुरस्कार विजेता रोनाल्डो हा जुवेंट्सशी जोडण्यापूर्वी ९ वर्षे रियलकडून खेळला आहे. केनने रोनाल्डोची जागा घ्यावी असे रियलचे नवीन मॅनेजर ज्युलेन लोपेतेग्युई यांनाही वाटते.
केनने रशियात झालेल्या विश्वचषकात सहा गोल केले म्हणून त्याने रोनाल्डोची जागा घ्यावी असे चाहत्यांचे म्हणणे आहे. पण त्याने इंग्लिश क्लबसोबत केलेला करार २०२४पर्यंत वाढवला आहे.
तसेच मागील तीन प्रिमियर लीगच्या हंगामाचा गोल्डन बूट दोनदा केनला मिळाला आहे. त्याने मागच्या हंगामात ३० गोल केले असून कारकिर्दीत एकूण १७५ गोल केले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनचा भांगडा नृत्याचा ठेका पहाच
–दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी