येत्या १६ जून पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय महिला संघ कसून सराव करत आहे. याचे कारणही तितकेच खास आहे. तब्बल ७ वर्षानंतर भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळणार आहे. या खास क्षणी महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि संघातील वरिष्ठ खेळाडू झुलन गोस्वामी यांनी संघातील खेळाडूंना जर्सी दिली होती. परंतु जर्सी देत असताना मितालीने पॅड्स घातल्याचे दिसून आले होते. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर तिने यामागचे कारण देखील सांगितले होते.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पुरुष क्रिकेट संघ सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये विलागिकरणात आहे. हे दोन्ही ही संघ गुरुवारी (३ मे) इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. तत्पूर्वी,महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांनी एक बैठक बोलवली होती. ज्यामध्ये खेळाडूंनी भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासाविषयी सादरीकरण केले होते.
तसेच मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना कसोटी संघाची जर्सी दिली होती. यावेळी मिताली राजने पॅड्स घातल्याचे निदर्शनात आले होते. ही बैठक झाल्यानंतर तिने सांगितले की, “मी फलंदाजीचा सराव करत असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते आणि मला वाटत होते की फलंदाजी प्रशिक्षकांच्या ते निदर्शनात यावे. कारण ही बैठक सुरू होण्यापूर्वी आम्ही फलंदाजीचा सराव करत होतो. जेव्हा बैठक सुरू झाली तेव्हा रमेश पवार यांनी मला म्हटले होते की, तू पॅड्स काढू शकतेस. परंतु मी नकार दिला होता. मला जास्त तास पॅड्स घालण्याची सवय लावायची आहे. त्यामुळे मी त्यांना बैठकीत पॅड्स घालून येऊ देण्याची विनंती केली होती.”
— BCCI Women (@BCCIWomen) May 30, 2021
भारतीय महिला संघाने शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकन महिला संघाविरुद्ध २०१४ मध्ये खेळला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने १ डाव आणि ३४ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!
व्वा! फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा राशिद खान झाला सिंगर, व्हिडिओ भन्नाट व्हायरल