---Advertisement---

मेरिलीबोन क्रिकेट समितीची शिफारस; म्हणाले, कसोटी मालिकेत किमान तीन…

On: शनिवार, फेब्रुवारी 10, 2024 3:09 PM
Test-Cricket
---Advertisement---

आज अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. याद्वारे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यावर अखेर पडदा पडला आहे. अशातच,कसोटी सामन्यांची मालिका किमान तीन सामन्यांची असावी आणि पाहुण्या संघाचा खर्च यजमान संघाने करावा अशी शिफारसी मेरिलीबोन क्रिकेट समितीच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीने केली आहे.

याबरोबरच, सध्या कसोटी क्रिकेट हा खेळ अधिक जोरदार होत असून त्यातील मनोरंजन कायम रहावे यासाठी २०२८पासून ‘आयसीसी’ने कसोटी मालिका किमान तीन सामन्यांच्या खेळवाव्यात असे मत जागतिक समितीने मांडले. त्याचवेळी पूर्ण सदस्य, सहयोगी सदस्य यांच्यामधील असमानता नष्टकरुन अनोळखी देशात क्रिकेट वाढविण्याची सूचना देखील जागतिक समितीने केली आहे.

क्रिकेटचे नियम बनविणाऱ्या ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट समितीची बैठक दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पार पडली असून या बैठकीत वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाचे कौतुक करण्यात आले. मात्र, मालिका दोन सामन्यांचीच असल्यामुळे ती बरोबरीत सुटली आणि विंडीजला आणखी संधी मिळाली नाही याबाबत खंत व्यक्त करण्यात आली आहे.

याबरोबरच या समितीने मालिकेतील पाहुण्या संघाच्या खर्चाची जबाबदारी यजमान मंडळाने उचलावी अशी महत्वपूर्ण सूचना देखील केली आहे. तर, आतापर्यंत पाहुण्या संघाचा खर्च त्यांचे क्रिकेट मंडळ करत होते. यजमान संघाच्या मंडळाला प्रसारमाध्यमाच्या हक्काची सर्व रक्कम मिळत असते.

पण, या जुन्या पद्धतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचे जागतिक समितीचे मत पडले आहे. तर खर्चाची ही असमानता लक्षात घेता भविष्यात यजमान मंडळाला पाहुण्या संघाचा खर्च करण्यास सांगावे असे या समितीने म्हंटले आहे.

दरम्यान, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकामुळे अमेरिकेतील २०२८च्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर तेथील क्रिकेटसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होण्यास चालना मिळेल, असे मतही या समितीने मांडले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

ICC U19 विश्वचषक ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ च्या रेसमध्ये 3 भारतीय, पहा संपूर्ण यादी…

IND vs ENG । ‘काहीच अडचण नाही, मी पण…’, विराटला सपोर्ट करताना डेल स्टेनने सांगितला स्वतःचा किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---