अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये अर्सेनल विरूद्ध पॅरीस सेंट-जर्मन (पीएसजी) यांच्यातील सामन्यात चक्क क्रेडीट कार्डने नाणेफेक करण्यात आली.
हा सामना अर्सेनलने नवीन कर्णधार मेसट ओझीलच्या नेतृत्वाखाली 5-1ने जिंकला. या सामन्यात अर्सेनलकडून ओझीलसह रॉब होल्डींग, एडी एनकेटीया, अलेक्झांड्रा लॅकझेट यांनी गोल केले.
नाणेफेकीवेळी या सामन्यात नाण्याऐवजी पंचांनी क्रेडीट कार्डचा वापर केला. अर्सेनलने जिंकलेल्या सामन्याबद्दल नाणेफेकीच्या गोष्टीने सोशल मिडियावर जोर धरला आहे.
I can’t believe my eyes in this Arsenal PSG game…. to decide kick off they just flipped a CREDIT CARD 😂😂😂 pic.twitter.com/ZtUKwPP21R
— Aaron 🌶 (@AaronDickinson) July 28, 2018
Did they just use a credit card for what used to be known as a “coin toss”?!
— Boston Gooners (@BostonGooners) July 28, 2018
https://twitter.com/FearTheKirch/status/1023170857395527680
तसेच सामना सुरू होण्याअगोदर एका पंचाने यलो कार्डवर ओझीलची स्वाक्षरी घेतली.या सामन्यात ओझीलने 13व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पीएसजी कडून क्रिस्तोफर कुकु याने 60व्या मिनिटाला गोल करून सामना बरोबरीत आणला होता.
https://twitter.com/WeAreOzil/status/1023175034163085317
The Ref asked @MesutOzil1088 for a signature on his yellow card before leaving the tunnel 😂🔴😊pic.twitter.com/iT8ivh9YKt
— Arsenal PLUG 🔌🔴⚪ (@ArsenalPLUG) July 28, 2018
मात्र नंतर होल्डींग, एनकेटीया आणि लॅकझेट यांनी केलेल्या गोलने हा सामना अर्सेनलने सहज जिंकला. तसेच हा सामना बघण्यासाठी 50,308 लोकांनी हजेरी लावली असून तो सिंगापूर नॅशनल स्टेडियमवरचा एक विक्रमच ठरला आहे.
या स्पर्धेतील अर्सेनलचा पुढील सामना हा चेलसा विरुद्ध 2 ऑगस्टला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–माजी कसोटीपटू अजय रात्राकडे टीम इंडियाची मोठी जबाबदारी
–स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो, इंग्लंडमधील खेळपट्ट्या कशा असतील याची क्युरेटरलासुद्धा कल्पना नाही