भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक खेळत आहे. संघाला मंगळवारी (2 ऑक्टोबर) एडिलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. परंतु त्याआधीच विराट कोहलीच्या हॉटेल रूममधील एक व्हिडिओ समोर आल. व्हिडिओ विराटच्या एका चाहत्याने काढला असून त्यात विराटची संपूर्ण रूम दाखवली गेली आहे. विराटने स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. परंतु आता त्याने याविषयी कुठलीही तक्रार दाखल करणार नसल्याचे सांगितले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ सिडनीमध्ये होता. विराट कोहली (Virat Kohli) याच्या रूममधील व्हिडिओ याच ठिकाणीचा आहे. विराटने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याला सर्वच क्षेत्रांमधून समर्थन मिळत आहे. व्हिडिओत विराटच्या रूममधील प्रत्येक गोष्ट दाखवली गेली आहे. त्याची सामानाने फरलेली सुटकेस, शूज, आणि कपडे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहेत. हा व्हिडिओ विराटला माहित नसताना काढला गेला असल्यामुळे तो चांगलाच निराज असल्याचे दिसते. परंतु, त्याने याविरोधात कोणतेही अधिकृत कारवाई करणार नसल्याचे सांगितेल आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल करण्यासाठी विराटडे विचारणा केली होती. परंतु त्याने कुठलीही तक्रात देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. एडियन एक्सप्रेसने याविषयी माहिती दिली आहे. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलच्या स्टाफने देखील या संपूर्ण प्रकणासाठी माफी मागितली आहे. हॉटेलकडून दिल्या गेलेल्या स्पष्टीकरणात सांगितल्यानुसार व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला आहे. तसेच यामध्ये सहभागी असणार्यांवर कारवाई देखील केली आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट टी-20 विश्वचषकातील सुरुवातीच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 82 धावा कुटल्या, तर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद 62 धावा कुटल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने स्वतःत विकेट गमावली असली, तरी पुढच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास
‘आम्ही येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आलेलो नाहीत’, थेट कर्णधाराने दिली कबूली