गेल्या काही कालावधीत टीम इंडियाने अनेक खेळाडूंना कर्णधार पदाची जबाबदारी देऊन त्यांना आजमावून पाहिले. गेल्या वर्षभरातच भारतीय संघाने एकुण ७ कर्णधार पाहिले आहेत. त्यामुळे भारताचा पूर्णवेळचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वावर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा प्रचलित समालोचक आकाश चोप्रा याने रोहितच्या नेतृत्वाची तुलना थेट भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार समजल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीसोबत केली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणतो की, “रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एमएस धोनीची झलक पाहायला मिळते. रोहित ज्या पद्धतीने प्लॅन करतो आणि ज्या पद्धतीने तो रिऍक्ट करतो. रोहित शर्मा खूप यशस्वी कर्णधार असेल कारण तो खेळाचा चांगला अभ्यास करतो आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ खूप आक्रमकपणे खेळतो.”
आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “रोहित शर्मा खेळाची नाडी पकडतो. खेळ कुठे चालला आहे हे त्यांना माहीत आहे. मर्याजदित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतो. त्यात एमएस धोनीची छोटीशी झलक पाहायला मिळते. एक मोठी गोष्ट म्हणजे तो मैदानावर आक्रमक दिसत नाही, पण त्याच्या नेतृत्वाखाली सर्व खेळाडू अतिशय आक्रमकपणे खेळतात. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळाडू मोकळेपणाने खेळतात हे यामागचे मोठे कारण असावे कारण रोहित त्यांना पाठीमागून सपोर्ट करतो. तो जबाबदारी घेतो आणि खेळाडूंना सांगतो की तुम्ही खेळा, मी तुम्हाला कमी पडू देणार नाही.”
दरम्यान, विराट कोहलीने एकापाठोपाठ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपदाला अलविदा केल्यानंतर टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली. पूर्णवेळ कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माने देशात आणि परदेशात खेळलेल्या सर्व मालिका भारताने जिंकल्या आहेत. आयपीएलमध्येही तो यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांमध्ये आशिया चषक, आगामी टी-२० आणि २०२३मध्ये भारतात होणारा वनडे वर्ल्डकप उंचावण्याचे स्वप्न साकारक करण्याची जिद्द निर्माण झाली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रोहितची कॅप्टन्सी सेम टू सेम धोनीसारखीचं!’ भारताच्या माजी दिग्गजानं केलाय दावा
‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला
धोनीचा सिक्स अन् भारतानं जिंकला पहिला टी-२० आशिया कप, रोहितही अशाच कामगिरीसाठी उत्सुक