डिसेंबर 2020 च्या दुसर्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगला सुरुवात होईल. या टी20 लीगचा हा 10वा हंगाम असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) या लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. बीबीएलमध्ये परदेशी क्रिकेटपटूंना भाग घेण्यास सीएने सहमती दर्शविली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन परदेशी क्रिकेटपटूंचा समावेश असेल. दरम्यान, बीबीएलमधील संघ एमएस धोनी, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्या संपर्कात असल्याची बातमी येत आहे.
खेळाडूंना राहावे लागेल क्वारंटाईन
बीबीएलमधील सर्व संघांना लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करावा लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर परदेशी खेळाडूंनाही क्वारंटाईनचे नियम पाळावे लागतील.
धोनी, रैना, युवराज यांना संघात घेण्यास उत्सुक
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार बीबीएलमधील संघ तीन भारतीय क्रिकेटपटुंना (धोनी, रैना, युवराज) संघात घेण्यास उत्सुक आहेत. यावर्षी 15 ऑगस्टला धोनी आणि रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. युवराजने मागील वर्षी बीसीसीआयच्या अंतर्गत असलेल्या क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत तिन्ही क्रिकेटपटूंना बीबीएलमध्ये खेळणे सहज शक्य आहे.
धोनी आणि रैनाला घ्यावी लागेल एनओसी
युवराज 2020-21 मध्ये होणाऱ्या बीबीएल स्पर्धेत भाग घेण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे. मात्र धोनी आणि रैना यांना बीसीसीआयकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागेल. धोनी आणि रैना आयपीएलचा भाग आहेत, तर युवी कोणत्याही प्रकारे भारतीय क्रिकेटशी जोडलेला नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही भारतीय क्रिकेटशी संबंधित किंवा बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूला बाहेरील कोणत्याही लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बोर्डाकडून एनओसी घ्यावी लागते.
महत्त्वाच्या बातम्या –
RRच्या गोलंदाजांवर SRHचे फलंदाज ठरले भारी; विजय मिळवत घेतली पाचव्या क्रमांकावर उडी
पांडेजी तुस्सी ग्रेट हो! RR विरूद्ध मनीष पांडेचा मोठा कारनामा; धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश
ट्रेंडिंग लेख –
स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज