---Advertisement---

बीसीसीआयकडून विराटला मिळणार होती कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने दिले स्पष्टीकरण

On: शनिवार, जानेवारी 22, 2022 11:11 AM
VIRAT-KOHLI-GANGULY-SHAH
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय यांच्यातील वादाच्या बातम्या गेल्या ३ महिन्यांपासून सातत्याने समोर येत आहेत. गेल्या ३ महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. यातील भारतीय संघाचे नेतृत्त्वबदल चर्चेचे केंद्रबिंदू ठरले होते. याबद्दल अनेक बाजूंनी चर्चा क्रिकेटविश्वात झाल्या. यातच, असेही समोर आले की, बीसीसीआय विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस बजावणार होते. पण, आता या प्रकरणाबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीच स्वत:च मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

विराटने डिसेंबर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यात आणि निवड समीतीमध्ये वनडे कर्णधारपदाबद्दल संवादाचा अभाव जाणवल्याचे सांगितले होते. तसेच त्याने गांगुलीच्या विधानांच्या विरोधी भाष्य केले होते. त्यामुळे माध्यमांतील वृत्तांनुसार गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस (a showcause notice) बजावणार होता.

गांगुलीने नाकारले दावे
आता गांगुलीने विराटला कारणे दाखवा नोटीस बजावायच्या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले आहे. त्याला या प्रकरणाबद्दल एएनआयने प्रश्न विचारला, यावर गांगुलीने उत्तर दिले की या सर्व चूकीच्या चर्चा आहेत. तो म्हणाला, ‘विराटला मी कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याच्या बातम्या खऱ्या नाहीत.’

अधिक वाचा – विराट-बीसीसीआय वाद सुरूच! गांगुली बजावणार होते कोहलीला कारणे दाखवा नोटीस

नक्की काय आहे प्रकरण? 
गेल्यावर्षी २०२१ टी२० विश्वचषकानंतर विराटने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे रोहित शर्माकडे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघांचे नेतृत्त्वपद देण्यात आले. विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यामागे मर्यादीत षटकांसाठी २ वेगवेगळे कर्णधार नकोत, असे कारण बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

तसेच त्यानंतर गांगुलीने म्हटले होते की, विराटला टी२० कर्णधारपद न सोडण्याबद्दल सांगण्यात आले होते, मात्र विराट त्याच्या निर्णयावर ठाम होता. पण विराटने या विरोधी भाष्य करताना दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी झालेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले की, त्याला संघनिवडीपूर्वी दीडतास आधी तो वनडे कर्णधार नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच टी२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याबद्दल कोणीही त्याला सांगितले नसल्याचे त्याने म्हटले. यानंतर विराट आणि बीसीसीआय व गांगुलीमध्ये वाद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

व्हिडिओ पाहा – अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले

त्यातच आता १५ जानेवारी रोजी विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर अचानक कसोटी कर्णधारपदही सोडले. त्यामुळे सध्या मैदानापेक्षा मैदानाबाहेरील भारतीय क्रिकेटच्या चर्चा जोरदार होत आहेत. आता या चर्चांना पूर्णविराम कधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

जिथे धोनी, गांगुलीसारखे कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या पेपरमध्ये झालेत फेल, तिथंच विराट आलाय अव्वल

बीसीसीआयकडून महत्वाची बैठक आयोजित, आयपीएल २०२२ विषयी होणार ‘हे’ निर्णय

बाबो! क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात तुम्ही असं कुणाला आऊट झालेलं पाहिलं नसेल, सतत पाहाल व्हिडिओ

अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले | Sachin | Dravid |  Kallis |

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---