Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिथे धोनी, गांगुलीसारखे कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या पेपरमध्ये झालेत फेल, तिथंच विराट आलाय अव्वल

जिथे धोनी, गांगुलीसारखे कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या पेपरमध्ये झालेत फेल, तिथंच विराट आलाय अव्वल

January 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
kohli-in-sa

Photo Courtesy: Twitter/BCCI


पार्ल। शुक्रवारी (२१ जानेवारी) दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्ध बोलंड पार्क येथे पार पडलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, यामुळे केएल राहुलच्या नेतृत्त्वात खेळत असलेल्या भारतीय संघाला ही वनडे मालिका गमवावी लागली आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्यात अपयशी ठरलेला ७ वा भारतीय कर्णधार ठरला आहे. 

आत्तापर्यंत भारताचा दक्षिण आफ्रिकेतील द्विपक्षीय, तिरंगी आणि चौरंगी वनडे मालिकांचा विचार केल्यास २०२२ मधील वनडे मालिका आठवी मालिका होती. यातील ७ वेळा भारताला मालिका जिंकण्यात अपयश आले आहे, तर केवळ एकदाच भारताने दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकली आहे.

भारताने २०१८ साली केलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता. त्यावेळी ६ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. ही वनडे मालिका भारताने विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना ५-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यावेळी भारताने दक्षिण आफ्रिकेवर निर्विवाद वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले होते. हा भारताचा दक्षिण आफ्रिकेमधील पहिलाच वनडे मालिका विजय होता. तसेच विराट दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार होता.

अधिक वाचा – शतकांचा नाही पण सचिनचा शुन्यावर आऊट होण्याचा रेकाॅर्ड विराट लवकरच मोडेल; पाहा यादीतील स्थान

विराटच्याआधी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यांना दक्षिण आफ्रिकेत नेतृत्त्व करताना भारताला वनडे मालिकेत विजय मिळवून देता आला नव्हता. तसेच आता केएला राहुलचेही नाव या यादीत जोडले गेले आहे. त्यामुळे अद्यापही विराट दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार आहे.

विशेष म्हणजे विराटने दक्षिण आफ्रिकेत केवळ ६ वनडे सामन्यांत नेतृत्त्व केले होते आणि त्यातील ५ सामने जिंकले होते. भारताच्या दक्षिण आफ्रिकेतील विराट कर्णधार नसतानाच्या गेल्या ६ सामन्यांचा विचार करायचा झाल्यास सहाही वनडेत भारताने पराभवच पत्करला आहे.

व्हिडिओ पाहा – अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटकडून काढले कर्णधारपद
विराटने नोव्हेंबर २०२१ मध्ये भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येण्यापूर्वी विराटकडून वनडे कर्णधारपदही निवड समीतीने काढून घेतले. त्यामुळे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे नेतृत्त्वपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले. पण, रोहितही दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे प्रभारी कर्णधार म्हणून केएल राहुलला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी नियुक्त करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या – 

बाबो! क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात तुम्ही असं कुणाला आऊट झालेलं पाहिलं नसेल, सतत पाहाल व्हिडिओ

Video: नाचण्यास कारण ‘पंत’! शुन्यावर आऊट होऊनही ड्रेसिंग रूममध्ये नाचत होता विराट

“…म्हणून टीम इंडिया अनेक वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीविना”; दिग्गजाने केली कारणीमीमांसा


ADVERTISEMENT
Next Post
VIRAT-KOHLI-GANGULY-SHAH

बीसीसीआयकडून विराटला मिळणार होती कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने दिले स्पष्टीकरण

IPL Auction

IPL 2022: लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंची नोंदणी! भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक क्रिकेटर, वाचा सविस्तर

KL Rahul and Hardik Pandya

नवा गडी, नवे राज्य! आयपीएलमध्ये नव्या संघाचे नेतृत्त्व करण्यास हार्दिक पंड्या-केएल राहुल सज्ज, पाहा काय म्हणालेत

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.