गुडलक बॉईज आयोजीत प्रजासत्ताक बॉक्स क्रिकेट स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी होत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून 2024 मध्ये स्पर्धेला सुरुवात झाली.
स्पर्धेची लोकप्रियता
या स्पर्धेला दोन वर्षातच चांगली लोकप्रियता मिळाली असून गेल्यावर्षी तब्बल 40 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावर्षी देखील स्पर्धा क्रॉसबार मल्टिस्पोर्ट्स एरेना, सिंहगड रोड, पुणे इथे होणार असून संघांची नावनोंदणी सध्या सुरु आहे. महा स्पोर्ट्स या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.
विजेत्यांना बक्षीस
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2100 रुपये शुल्क असून विजेत्या संघाला 11 हजार 111 रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहेत, तर उपविजेत्या संघाला 7 हजार 777 रुपये मिळणार आहे.
स्पर्धेचे नियम
स्पर्धा व्यवस्थित पार पडावी यासाठी आयोजकांनी काही नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये प्रत्येक संघात 7 खेळाडूंनाच सहभाग नोंदवता येईल. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल. प्रत्येक खेळाडूला फक्त एकच षटक गोलंदाजी करता येईल. पहिलं षटक हे पॉवरप्ले असेल. मागील पर्वातील विजेता व उपविजेता संघ तसेच त्या संघातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत.
अधिक माहितीसाठी संपर्क
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच स्पर्धेत स्पॉन्सर्स म्हणून सहभागी होण्यासाठी 8669664458 किंवा 8149255927 या क्रमांकावर इच्छुकांनी कॉल करावा.