भारताच्या डेव्हिस कप लढतीनंतर लिएंडर पेसच्या वक्तव्यावर भाष्य करेल असे भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीने म्हटले आहे. डेव्हिस कप दुहेरीमध्ये स्थान न दिले गेल्यामुळे नाराज लिएंडर पेसने परवा भूपतीवर तोफ डागली होती .
भूपती म्हणाला कि आम्ही सध्या पूर्णपणे डेव्हिस कप लढतींवर केले असून भारताच्या डेव्हिस कप विजयानंतर लिएंडर पेस च्या आरोपांबद्दल मी भाष्य करेल. सध्या भारत डेव्हिस कप लढतीत भारत २-० असा उझबेकिस्तान बरोबर आघडीवर असून ही लढत कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोशिएशनच्या मैदानावर सुरु आहे.
२७ वर्ष भारताचं डेव्हिसकप मध्ये नेतृत्व करणाऱ्या पेसला पहिल्यांदाच डेव्हिस कप संघात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे चिडलेल्या पेसने भूपतीवर जोरदार टीका केली होती. आपल्या भूपती बरोबरच्या पूर्वीच्या दुरावलेल्या संबंधांमुळेच आपल्याला संघात स्थान न मिळाल्याचे संकेत परवा पेसने दिले होते.
मेक्सिकोमध्ये चॅलेंजर टूर जिंकलेल्या अनुभवी पेस ऐवजी कर्णधार भूपतीने रोहन बोपण्णाला संघात स्थान दिले होते. रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुंनेश्वरन यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून काल भारताला २-० अशी पहिल्या दिवशी भारताला बढत मिळवून दिली आहे.
भारताच्या विजयाबद्दल विचारले असता भूपती म्हणाला, युकी भाम्बरी आणि साकेत मायनेनी यांच्या अनुपस्थितीत भारताचे एकेरीतील खेळाडू अतिशय उत्तम खेळले. रामने पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताला विजयाचा मार्ग दाखवला. ज्याची अतिशय गरज होती.
आज भारताचा दुहेरीचा सामना आहे. तो जिंकून आजच भारत जागतिक ग्रुप मध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहे. आजची लढत ६ वाजता सुरु होणार आहे.