भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एशिया कप स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीला आराम मिळावा म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.
या स्पर्धेत रविवारी भारताने पाकिस्तानविरूद्ध 9 गड्यांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित आणि शिखर धवनने दमदार शतक ठोकत भारताला विजश्री मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली.
विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपद रोहित शर्मासाठी फलदायी ठरत आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहितने खेळलेल्या मागच्या 7 सामन्यात त्याने 121.50 च्या सरासरीने तब्बल 486 धावा काढल्या आहेत.
पाकिस्तानविरूद्धच्या रविवारच्या सामन्यात रोहित चांगलाच फॉर्ममध्ये दिसला त्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी 111 नाबाद खेळी केली. मागील सात डावात कर्णधार म्हणून त्याने अनुक्रमे 111*,83*,53, 23, 7, 208, 2 धावा केल्या आहेत.
रोहित आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, आणि 2017 साली आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या –
–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर