---Advertisement---

११ वर्षे आयपीएलशी जोडलेला हा व्यक्ती २०१९च्या आयपीएल लिलावात दिसणार नाही!

---Advertisement---

2019 आयपीएल लिलावाच्या तयारीला सर्व संघांनी सुरुवात केली आहे.  हा लिलाव 18 डिसेंबरला जयपूर येथे पार पडणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये साधारण 1003 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.

मात्र यावर्षीच्या या लिलावात एक मोठा फरक संघमालकांसह चाहत्यांना दिसणार आहे. तो म्हणजे आयपीएलच्या लिलावातील  लिलावकर्ते रिचर्ड मॅडली यावर्षी दिसणार नाहीत. त्यांची लिलावादरम्यान त्यांचा चश्मा थोडा नाकावर घेऊन समोर संघमालकांच्या टेबलकडे नजर टाकण्याची शैली चाहत्यांना आवडायची.

पण यावर्षी बीसीसीआयने ह्यूज एजमेड्स यांची रिचर्ड यांच्या ऐवजी आयपीएलच्या लिलावासाठी लिलावकर्ता म्हणून निवड केली आहे. एजमेड्स हे चॅरिटी आणि क्लासिक कार याचे लिलावकर्ता असून त्यांना तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

रिचर्ड मॅडली हे आयपीएलच्या पहिल्या लिलावापासून लिलावकर्ता होते. तसेच ते गेली 11 वर्षे आयपीएलच्या लिलावाचे लिलावकर्ता म्हणून काम पाहत होते. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आयपीएलशी जोडले गेलेल्या रिचर्ड मॅडली यांनी त्यांचा चाहतावर्ग निर्माण केला होता.

पण यावर्षी ते आयपीएल लिलावत नसणार, याची त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2019 च्या आयपीएलचा लिलावात सहभागी होणार नसल्याबद्दल माफ करा. सुरुवातीपासून आयपीएलचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. भारतातील माझ्या मित्रांना आणि माझ्या चाहत्यांना मी मिस करेल. धन्यवाद.’

तसेच रिचर्ड यांनी आयपीएल 2019च्या लिलावात सामील न होण्याचा त्यांच्या निर्णय नव्हता हे देखील स्पष्ट करताना त्यांनी बीसीसीआयने आयपीएल लिलावासाठी त्यांना आमंत्रित न केल्याचे सांगितले आहे.

त्यांनी याबद्दल ट्विट करताना म्हटले आहे की ‘तूमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पण मला स्पष्ट करायचे आहे की हा माझा निर्णय नव्हता. मला आयपीएल लिलावाचा लिलावकर्ता म्हणून बीसीसीआयने आमंत्रित केले नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास मला वगळण्यात आले आहे.’

त्यांना 2019 च्या आयपीएल लिलावातून लिलावकर्ता म्हणून बदलण्याचे कारण अजूनतरी बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण त्यांच्या ऐवजी ह्यूज एजमेड्स यांच्या नावावर आयपीएल 2019 च्या लिलावासाठी लिलावकर्ता म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या सत्रात आॅस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश

कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment