भारत-ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा धुव्वा उडवला. भारताच्या या पराभवानंतर अनुभवी खेळाडू ‘मोहम्मद शमी’च्या (Mohammed Shami) दुखापती व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी दिग्गज रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि रिकी पाॅन्टिंग म्हणाले की, जर या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील दुसऱ्या भागात संघात समावेश केला असता तर भारताला वरचा हात मिळू शकला असता.
घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (टी20) आणि विजय हजारे ट्राॅफी (वनडे) या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले गृहराज्य असलेल्या बंगालसाठी प्रभावी कामगिरी केली, त्यामुळे भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाच्या आशा वाढल्या, परंतु भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) आणि वैद्यकीय पथकाने गुडघ्याच्या जळजळाचे कारण देत मेलबर्नमधील चौथ्या कसोटीपूर्वी त्याच्या पुनरागमनाची शक्यता अधिकृतपणे नाकारली होती.
मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने मोहम्मद शमीला भारतीय संघात घ्यायला हवे होते, असे वक्तव्य दिग्गज रिकी पाॅन्टिंग आणि रवी शास्त्री यांनी केले आहे.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यूमध्ये सांगितले की, “खरे सांगायचे तर, मोहम्मद शमीचे शेवटी काय झाले याबद्दल मीडियामध्ये जे काही चालले होते ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले. तंदुरुस्त राहण्याच्या बाबतीत तो कुठे असतो? तो एनसीए (भारतीय क्रिकेट अकादमी) मध्ये किती काळ आहे, हे मला माहीत नाही, तो कोणत्या स्थितीत आहे याबद्दल योग्य संवाद साधता आला असता, जर मला निर्णय घ्यायचा असता तर मी त्याला ऑस्ट्रेलियात आणले असते. तेव्हा आम्ही मेलबर्नला गेलो असतो आणि सिडनी कसोटीचा निकाल त्याच्या बाजूने वळवला असता.”
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार असलेल्या ‘रिकी पाॅन्टिंग’नेही (Ricky Ponting) शास्त्रीच्या शब्दांचे समर्थन करत म्हटले की, “मला खरोखरच आश्चर्य वाटते की, त्याला मालिकेच्या मध्यभागी संघात का समाविष्ट करण्यात आले नाही, जरी त्याने कमी षटके टाकली असती तरीही त्याने एक खेळी केली असती. जेव्हा तुम्ही मला सुरूवातीला विचारले होते की (आयसीसीच्या शेवटच्या पुनरावलोकनात) मालिकेचा निकाल काय असेल, तेव्हा मी म्हटले होते की ऑस्ट्रेलिया 3-1 ने जिंकेल कारण शमी भारतीय संघात नाही, जर शमी, बुमराह आणि सिराज असतील, तर मला वाटते की निकाल वेगळा असू शकतो.”
मोहम्मद शमीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 64 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 122 डावात गोलंदाजी करताना 229 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 27.71 राहिली आहे. तर इकाॅनाॅमी रेट 3.30 आहे. 9/118 ही त्याची कसोटीच्या एका सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; अफगाणिस्तानविरूद्ध नाही खेळणार इंग्लंड? ईसीबीने सांगितले कारण
भारताच्या युवा खेळाडूनं जिंकली चाहत्यांची मनं, ऑस्ट्रेलियाच्या लहान मुलाला दिली बॅट
हा गोलंदाज असता तर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली असती, पाँटिंगचे धक्कदायक विधान