---Advertisement---

‘विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,’ रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 1:42 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य संघांपैकी एक आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियन संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, वेस्ट इंडिज संघाने देखील ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले होते. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग जस्टिन लँगर यांना समर्थन करण्यासाठी पुढे आला आहे.

नुकताच १८ ऑगस्ट रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रशिक्षक जस्टिन लँगरसोबत आपत्कालीन झुम मीटिंगचे आयोजन केले होते. या मीटिंगमध्ये प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तसेच या मीटिंगमध्ये बोर्डाचे चेअरमन इअर्ल एडींग्स, सीईओ निक हॉक्ली, कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन आणि मर्यादित षटकांचा कर्णधार पॅट कमिन्सने देखील सहभाग घेतला होता.

या मुद्द्यावर आपले मत मांडताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग म्हणाला, “मला यात काहीच शंका नाही की, गेल्या काही आठवड्यात खूप नकारात्मकता पसरली आहे. मला लँगरसाठी खूप वाईट वाटत आहे आणि मी त्यांना अनेकदा फोन देखील केला आहे. ते वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावरून परतले आणि त्यांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतले होते. मी आणि त्यांचे काही जवळचे मित्र त्यांना भेट देण्यासाठी गेलो होतो.”(Ricky ponting came in full support of coach Justin Langer)

लेंगरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला वेस्ट इंडीज संघाने १-४ ने तर बांगलादेश संघाविरुद्ध देखील १-४ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

रिकी पाँटिंग पुढे म्हणाला की, “मी लँगर यांना स्पष्टपणे म्हटले होते की, जेव्हा ऑस्ट्रेलियासाठी तुम्ही या पदावर असता तेव्हा, तुम्ही कर्णधार असो किंवा प्रशिक्षक तुम्हाला नकारात्मकतेचा सामना करावा लागेल. तसेच कर्णधार आणि संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी काय करू शकतो, यावर आम्ही चर्चा केली आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

बीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार सामने

रोहितच्या इंग्लंडमधील फलंदाजीने ‘हा’ बडा खेळाडू प्रभावित, शतक ठोकण्याची व्यक्त केली इच्छा

केकेआरच्या खेळाडूंची ‘क्वारंटाईन अंतक्षरी’ पाहिली का? व्हिडिओ पाहून होईल पैसावसूल मनोरंजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---