---Advertisement---

रिकी पॉटिंगचे झाले सोशल मीडियावर पदार्पण, शेअर केले हे खास फोटो

On: शुक्रवार, डिसेंबर 13, 2019 10:00 AM
---Advertisement---

जगभरातील क्रिकेटपटू आपले विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच त्यांचे फोटो चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅटिंगनेही(Ricky Ponting) सोशल मीडियावर पदार्पण केले आहे.

त्याने बुधवारी ट्विटर आणि इस्टाग्रामवर त्याचे अकाऊंट सुरु केले आहे. त्याने ट्विटरवर मुलगा फ्लेचरबरोबर (Fletcher) क्रिकेट खेळत असतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. तर इस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाला आपल्या नेतृत्वाखाली दोनवेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॉटिंगने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, “आज पहिल्यांदाच – अखेर सोशल मीडियावर मी आलो आणि मुलगा फ्लेचरसह पहिले नेट सेशन.”

 

2012 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाॅटिंग कसोटी आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

त्याने 168 कसोटी सामन्यात 13378 धावा आणि 375 वनडे सामन्यात 13704 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे विश्वचषक जिंकले आहे.

स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांच्या नेतृत्वाखाली 1999 मध्ये विश्वचषक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाचादेखील तो भाग होता.

https://www.instagram.com/p/B57MOTVBTdA/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---