भारतीय क्रिकेटमध्ये सध्या अनेक युवा खेळाडू येताना दिसत आहेत. आयपीएल तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या दमदार कामगिरीने हे खेळाडू आपली छाप पाडत असून, त्यांचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू कौतुक करतायेत. कशा आहात भारतीय संघाच्या पुढील पिढीचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने कौतुक केले. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने भारताच्या सर्व युवा खेळाडूंचे गोडवे गायले.
आयसीसीसोबत बोलताना रिकी पाँटिंग याने भारताच्या अनेक युवा खेळाडूंचे कौतुक केले. नुकतेच भारतीय संघासाठी पदार्पण केलेल्या यशस्वी जयस्वाल याच्याबद्दल बोलताना तो म्हणाला,
“यशस्वी जयस्वालची यावेळची आयपीएल खास होती. तो आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर रात्रीत सुपरस्टार झाला आहे. प्रत्येकाला माहिती होते की, तो एक दर्खेजेदार ळाडू आहे. मात्र, जे मी यावर्षी आयपीएलमध्ये पाहिले, ते लाजवाब होते.”
तसेच नुकतेच एशियन गेम्ससाठी भारतीय संघाचे नेतृत्व दिलेल्या ऋतुराज गायकवाड याच्याविषयी देखील त्याने अशीच प्रतिक्रिया दिली. पुढील काळात ऋतुराज हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये राज्य करेल असे मत त्याने व्यक्त केले. तर पृथ्वी शॉ हा आपल्या खेळात थोडी सुधारणा केल्यास पुन्हा एकदा दमदार कामगिरी करू शकतो असे प्रतिपादन त्याने केले.
यासोबतच सातत्याने डावलले जात असलेल्या सर्फराज खान याच्या विषयी बोलताना तो म्हणाला,
“मला सर्फराजसाठी थोडे वाईट वाटते. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 80 ची सरासरी असूनही त्याला कसोटी संघात जागा मिळत नाहीये. मात्र, ते काही कारणांमुळे सरफराजच्या जागी इतर खेळाडूंना सातत्याने निवडत आहेत.” पॉंटिंग मागील चार वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत असल्याने तो भारतीय खेळाडूंवर विशेष नजर ठेवून असतात.
(Ricky Ponting Praised Indian Young Batters Like Ruturaj Gaikwad Yashasvi Jaiswal And Sarfraz Khan)
महत्वाच्या बातम्या –
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ च्या रोमांचक सामन्यांचा आनंद घेतला
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’