आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजले असून भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील बहुप्रतिक्षित सामना २८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीत पाकिस्तानचे लक्ष्य भारतीय संघाला पराभूत करत स्पर्धेची शानदार सुरुवात करण्यावर असेल. तर भारतीय संघ मागील टी२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढत पाकिस्तानला हरवण्यासाठी प्रयत्नशील असेल. या महामुकाबल्यापूर्वी महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंग यांनी या सामन्यातील विजेत्या संघाबद्दल भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या (Australia Tea) या माजी कर्णधाराला (Ricky Ponting) असे वाटते की, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या लढतीत रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखालील संघ विजयी होईल.
आयसीसीच्या रिव्ह्यूमधील एका एडिसोडमध्ये पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाले की, “फक्त आशिया चषकात नाही तर कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्ध सामना जिंकणे नेहमीच कठिण असते. परंतु मला वाटते की, जेव्हा टी२० विश्वचषकात भारतीय संघ आणखी जास्तच मजबूत दिसतो. त्यांच्या संघातील खोली निश्चितपणे इतर संघांच्या तुलनेत खूप जास्त आहे. म्हणून मला वाटते की, भारतच आशिया चषक जिंकेल.”
🇮🇳 v 🇵🇰
Ricky Ponting talks about the India-Pakistan rivalry and predicts winner of the Asia Cup on The ICC Review 📺
More 👉 https://t.co/0fqEuy89in pic.twitter.com/Ol4p29Gg8v
— ICC (@ICC) August 13, 2022
तसेच पुढे भारत-पाकिस्तान संघातील सामन्याबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाले की, “मी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयासाठी प्रार्थना करेल. पण याचा अर्थ असा नाही की, मी पाकिस्तानला कमी लेखत आहे. कारण ते एक अविश्वसनीय क्रिकेट राष्ट्र आहेत, जे सातत्याने मातब्बर खेळाडूंना मंच उपलब्ध करून देतात.”
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघ १४ वेळा आमने सामने आले आहेत. या १४ सामन्यांपैकी ८ सामने भारताने जिंकले आहेत, तर ५ वेळा सामन्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागला आहे. एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील लोकप्रियतेबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाले, “एक क्रिकेटप्रेमी म्हणून जेव्हाही असे सामने होतात, तेव्हा बसून सामना पाहायला मजा येते. कारण प्रत्येक गोष्टीचा स्तर वाढत जातो.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा