मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने 319 चेंडूत 106 धावा केल्या. त्याने त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 280 चेंडूचा सामना केला.
त्याचे हे शतक ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारतीय खेळाडूने केलेले तिसरे धीम्या गतीचे(चेंडूच्या तूलनेत) शतक ठरले आहे. विषेश म्हणजे पुजाराचेही त्याच्या 17 कसोटी शतकांमधीलही हे सर्वात धीम्या गतीचे(चेंडूच्या तूलनेत) शतक आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटिंगने cricket.com.au. शी बोलताना पुजाराच्या या धीम्या गतीने केलेल्या शतकावर टीका करताना म्हटल आहे की, ‘जर भारत पुढे जाऊन हा सामना जिंकला तर ही खूप चांगली खेळी ठरेल. पण भारताला जर ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात बाद करण्यात अपयश आले तर त्यांना ते महागात पडू शकते.’
‘त्याने आणखी एक शतक केले आहे, या मालिकेतील दुसरे शतक. त्यामुळे तो चांगला खेळला तो बाद होणे अवघड वाटत होते. पण त्याने स्वत:ला असे अडकवले होते की त्याला धावागती वाढवणे अवघड होत होते.’
पॉटिंग पुढे म्हणाला, ‘ त्यांच्याकडे अन्य खेळाडू आहेत जे आक्रमक खेळू शकतात. पण जर त्या खेळाडूंना खेळायलाच येता आले नाही तर धावगती वाढणार नाही. त्यामुळे ती धावगती प्रतिषटक 2 धावा एवढीच राहिल. ज्यामुळे सामना जिंकणे अवघड आहे. विशेषत: इथे पाटा वाटणाऱ्या खेळपट्टीवर.’
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. तसेच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांतच संपुष्टात आला आहे. भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून मयंक अगरवाल 28 आणि रिषभ पंत 6 धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विजय- राहुलला जे ८ डावात जमलं नाही ते मयांक अगरवालने २ डावात करुन दाखवलं
–Video: कर्णधार टिम पेनची बडबड थांबेना, आता रिषभ पंतला केले टार्गेट
–तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की