---Advertisement---

कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 1:53 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयासह हंगामाची दणदणीत सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. अशातच आता दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी रिषभ पंतची तुलना दिग्गज कर्णधारांसोबत केली आहे.

रिषभ पंतने, कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत केले होते. यानंतर त्याचे सर्वत्रच कौतुक केले गेले होते. आता रिकी पाँटिंग यांनी त्याच्याबद्दल बोलताना म्हटले आहे की, “तुम्हाला वाटते की पंतने सामन्यात ताबडतोब खेळी करण्याच्या भूमिकेत उतरावे आणि अधिकाधिक वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा. तो ज्याप्रकारे विचार करतो ते विराट कोहली आणि केन विलियम्सन सारखेच आहे. तो जर खेळपट्टीवर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला; तर तुम्ही सामना नक्की जिंकणार, कितीही धावा करायच्या असल्या तरीही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “रिषभ एक ऊर्जावन खेळाडू आहे. तुम्ही ते यष्टीचा मागे ऐकू शकता. त्याला सामन्यात राहायला आवडतं. तो एक विजेता खेळाडू आहे. जर त्याच्या फलंदाजीसोबत त्याने यष्टीरक्षणात सुधारणा केली तर तो येणारे १०-१२ वर्षा भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करू शकतो.”

ऍडम गिलख्रिस्टसोबत होणाऱ्या तुलनेवर रिकी पाँटिंग म्हणाले की, “तो (गिलख्रिस्ट) एक उत्कृष्ट खेळाडू होता. यात शंकाच नाही की, गिलख्रिस्टचे यष्टीरक्षण रिषभ पंतपेक्षा चांगले होते. परंतु मी त्याला भारतातील, फिरकीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर यष्टीरक्षण करताना पहिली, त्याने अपेक्षा होती त्यापेक्षा चांगली यष्टीरक्षण कामगिरी केली.”

महत्त्वाच्या बातम्या-

पदार्पण गाजवलं, आता अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जायचंय डेटवर; राजस्थानच्या नवख्या शिलेदाराची ‘मोठी विश’

कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा

‘टॉपवर आरामात बसू नकोस,’ कोहलीची वनडे क्रमवारीतील बादशाहत संपवणाऱ्या आझमला दिग्गजाची चेतावणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---