---Advertisement---

‘टॉपवर आरामात बसू नकोस,’ कोहलीची वनडे क्रमवारीतील बादशाहत संपवणाऱ्या आझमला दिग्गजाची चेतावणी

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 12:09 PM
babar azam
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना केली जाणाऱ्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने बऱ्याच दिवसांपुर्वी वर्तवलेला अंदाज खरा ठरवला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी करून एकदिवसीय क्रमवारीत कोहलीला मागे टाकले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने त्याला शुभेच्छा देत एक मजेदार असा सल्ला दिला आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत बाबर हा प्रथम क्रमांकाचा फलंदाज ठरला असून या क्रमवारीत ऑक्टोबर 2017 पासून अव्वलस्थानी असलेल्या कोहलीला त्याने मागे टाकले आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्वरूपात कोहली 1258 दिवस प्रथमस्थानी विराजमान होता.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज जाफरने आयसीसीच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना लिहले आहे की, “अभिनंदन बाबर आझम, तू या यशासाठी पात्र आहेस. पण अव्वल स्थानावर पोहोचून तू आरामात बसू नकोस, कारण विराट कोहलीला चेस करायला किती आवडते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे.”

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने केवळ 129 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याने एकही शतक मारले नव्हते. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाबर आझमने चांगली कामगिरी केली. त्याने या 3 एकदिवसीय सामन्यात 76 च्या सरासरीने 228 धावा केल्या आणि त्याचा आयसीसी क्रमवारीत त्याला फायदा झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

बाबर आझमने गाजवला दिवस! सकाळी वनडेत नंबर वन, तर संध्याकाळी टी२० शतकासह पाकिस्तानला मिळवून दिला विजय

विराटची वनडे क्रमवारीतील १२५८ दिवसांची बादशाहत संपली, ‘हा’ फलंदाज आला पहिल्या क्रमांकावर

विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---