---Advertisement---

कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 12:31 PM
---Advertisement---

सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने उत्कृष्ट कामगिरी करत शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. या सामन्यात दीपक हुडाने पंजाबच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांच्यात वाद झाला होता, ज्यामुळे हुडावर बंदी लावण्यात आली होती. यावेळी त्याच्या कठीण काळात कुठल्या क्रिकेटपटूंनी त्याला साथ दिली याबाबतचा खुलासा त्याच्या वडिलांनी केला आहे.

दीपक हुडाचे वडील जगबीर हुडा यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “हा काळ दीपक हुडासाठी कठीण काळ होता. तो त्याच्या संघातील खेळाडूंमुळे अडचणींमध्ये आला होता. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेपूर्वी तो बायो बबलमध्ये होता आणि कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे ही परिस्थिती अजून खराब झाली होती. दीपक हुडाने आवाज उचलला तर त्याच्यावर एक हंगामासाठी बॅन लावला होता. या परिस्थितीत तो खूप निराश झाला होता. अशातच त्याला सल्ला आणि समर्थनाची आवश्यकता होती. अशावेळी इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी माझ्या मुलासोबत खूप वेळ घालवला. हे दोघे माझ्या मुलासोबत नेट्समध्ये खूप वेळ घालवत असत.”

दीपक हुडाने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ६४ धावांची आक्रमक खेळी केली होती. या खेळीमुळे पंजाब किंग्ज संघाने २२१ धावांपर्यंत मजल मारली होती.

दीपक हुडा देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करतो. सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत, दीपक हुडा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याने बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्या याच्यावर आरोप केले होते की, कृणाल पंड्या संघातील खेळाडूंवर अपशब्दांचा वापर करतो. यानंतर बडोदा क्रिकेट बोर्डाने दीपक हुडावर एका हंगामासाठी प्रतिबंध घातले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टॉपवर आरामात बसू नकोस,’ कोहलीची वनडे क्रमवारीतील बादशाहत संपवणाऱ्या आझमला दिग्गजाची चेतावणी

बेजबाबदार फलंदाजीने SRHची दयनीय अवस्था, संघ मालकाची लेक आली रडकुंडीला; फोटो व्हायरल

RCBvsSRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संकटमोचक, शाहबाज अहमद आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---