बुधवारी (१४ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना आणखी एक अटीतटीचा सामना पहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर हैदराबाद संघाची समर्थक भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबाद संघाला १५० धावांचे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आल्याचे दिसून आले. हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाने ६ धावांनी गमावला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाचे क्रिकेट चाहते निराश दिसून आले. तसेच एका क्रिकेट चाहतीला पराभव पाहून अश्रू अनावर झाले आणि ती स्टेडियममध्येच रडायला लागल्याचे पाहायला मिळाले.
त्या रडणाऱ्या मुलीचे नाव ‘काव्या मारन’ आहे. २९ वर्षीय काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबादचे संघमालक कलानिधी मारन यांची सुपुत्री आहे. तसेच कलानिधी मारन हे ‘सन नेटवर्क’चे संस्थापक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ती स्टेडियममध्ये येऊन हैदराबाद संघाला समर्थन करत आहे. काव्या मारनने चेन्नईमधून आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ती आपल्या वडिलांच्या व्यापारात देखील त्यांना मदत करते.
https://twitter.com/nirmal_indian/status/1382410741521653760?s=20
https://twitter.com/VishnuT60510909/status/1382391191828787201?s=20
https://twitter.com/the_indianstuff/status/1382522911097982980?s=20
https://twitter.com/Cric_Karthikk/status/1382399409019756544?s=20
https://twitter.com/DileepTarak3/status/1382399853280432128?s=20
असा होता सामना
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पडीक्कल लवकर माघारी परतला; तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. यासोबतच ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत ५९ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २० षटक अखेर ८ बाद १४९ धावा केल्या होत्या.
त्यांच्या १५० धावांचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने सर्वाधिक ५४ धावा केल्या. तर मनीष पांडेने ३८ धावा केल्या. हैदराबादच्या इतर फलंदाजांना विशेष खेळी करता न आल्याने बेंगलोरने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर करत आयपीएल २०२१ स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBvsSRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संकटमोचक, शाहबाज अहमद आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती
“संघनायकाने माझ्या कुवतीवर विश्वास दाखवला याचा आनंद,” शाहबाज अहमदचे मन जिंकणारे वक्तव्य






