भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला आपल्या साधारण यष्टिरक्षणामुळे अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत देखील हाच सिलसिला कायम असल्याचे दिसून येत आहे. सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन झेल सोडल्याने पंतच्या यष्टिरक्षणावर अनेक दिग्गजांनी टीका केली आहे.
रिषभ पंतचा आयपीएलमधील प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने देखील दोन सोपे झेल सोडल्याने पंतला लक्ष्य केले. त्याने पंतला आपल्या कौशल्यावर अधिक मेहनत घेण्याचाही सल्ला दिला.
पदार्पणानंतर सर्वाधिक झेल सोडणारा यष्टीरक्षक
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाबाबत माध्यमांशी बोलताना पॉंटिंग म्हणाला, “पंतने जे दोन झेल सोडले, ते पकडले जायला हवे होते. कारण दोन्ही झेल अतिशय सोप्पे होते. रिषभ भाग्यवान होता की पुकोवस्कीने झेल सोडल्यानंतर शतक किंवा द्विशतक झळकाविले नाही. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अशा प्रकारे झेल सोडणे महागात पडले असते.”
पंतला आयपीएलमध्ये प्रशिक्षण देणारा पॉंटिंग पुढे म्हणाला, “पदार्पणानंतर पंतने इतर यष्टीरक्षकांच्या तुलनेत अधिक झेल सोडले आहेत. त्याला आपल्या या कौशल्यावर काम करण्याची नितांत गरज आहे.”
पुकोवस्कीचे केले कौतुक
रिकी पॉंटिंग ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्कीच्या कामगिरीने प्रभावित झालेला दिसला. त्याने ट्विट करत पुकोवस्कीचे कौतुक केले. “विल पुकोवस्कीच्या आजच्या खेळीने मी अतिशय प्रभावित झालो आहे. पदार्पणातच अशा प्रकारे खेळ करणे, आशादायक आहे आणि अडचणींवर मात करून संधीचा फायदा उठवण्याची त्याची वृत्ती कौतुकास्पद आहे”, अशा शब्दांमध्ये पॉंटिंगने पदार्पणवीराची स्तुती केली.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून शतकवीर स्टीव स्मिथने १३१ धावांची झुंजार खेळी उभारली. त्याच्या प्रत्युतरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९६ धावा केल्या असून ते अजूनही २४२ धावांनी पिछाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कसोटी फलंदाजांची नावे ऐकून गोलंदाजांचा उडतो थरकाप, काढल्यात खोऱ्याने धावा
वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा
रोहित शर्माने लायनविरुद्ध मारलेला ‘तो’ षटकार ठरला ऐतिहासिक; पाहा काय आहे रेकॉर्ड