---Advertisement---

पंजाबने तब्बल २२ कोटी खर्च केलेले खेळाडू उर्वरित आयपीएल २०२१ मधून बाहेर, ‘हा’ नवखा खेळाडू संघात सामील

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१(आयपीएल) हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. या दरम्यान सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघ आधीच यूएईला दाखल झाला. तसेच इतर संघ देखील लवकरच यूएईला रवाना होतील.

दरम्यान, आयपीएलचा संघ पंजाब किंग्सच्या ताफ्यातून एक बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामात पंजाब किंग्जने रिले मेरेडिथ आणि झाय रीचर्डसन यांना संघात सामील केले होते. मात्र आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात हे दोन्ही खेळाडू खेळणार नसल्याची माहिती समोर आली.

त्याऐवजी पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला संघात सामील केले आहे. विशेष म्हणजे १४ व्या हंगामात पंजाब किंग्सने मेरिडेथला (८ कोटी) आणि रिचर्डसन (१४ कोटी) असे २२ कोटी देऊन संघात सामील केले होते. मात्र दोघांची ही कामगिरी म्हणावी तशी झाली नाही.

मेरेडिथने ५ सामन्यांमध्ये केवळ ४ विकेट घेतल्या होत्या. ज्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ९.९४ धावा प्रती षटक इतका होता. तर रिचर्डसनने ३ सामन्यात ३ विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी सुद्धा १० धावा प्रती षटक एवढी होती. तसेच गोलंदाजीतही रिचर्डसन अपयशी ठरला. यात त्याने केवळ १५ धावा केल्या.

त्यामुळे, पंजाब किंग्सने आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला संधी देण्याचे ठरवले. एलिसने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टी-२० मध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात एलिसने हॅट्रिक घेतली होती. २ टी-२० सामन्यांमध्ये एलिसने ५ विकेट घेतल्या. एलिसच्या अशा कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियन संघाने टी-२० विश्‍वचषक स्पर्धेत देखील एलिसला संधी दिली आहे.

त्यामुळे पंजाब किंग्जने देखील त्याला उर्वरित आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या संघात सामील केले. तसेच पंजाब किंग्स आणखी एका खेळाडूच्या शोधात आहे. लवकरच पंजाब किंग्स दुसऱ्या खेळाडूला हे संघात सामील करेल. दरम्यान मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघ यूएईमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांचा सराव देखील चालू झाला आहे. १९ सप्टेंबरला पहिला सामना याच २ संघांमध्ये होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
“दोन्ही देशांतील संबंध सुधारल्यास भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेल”
‘आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे…’, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य
तयारी टी२० विश्वचषकाची! बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केली कर्णधार विराट कोहलीसह महत्त्वपूर्ण चर्चा

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---