वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची बुधवारी (दि. 05 जुलै) घोषणा झाली. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. यात तिलक वर्मा याचाही समावेश आहे. मात्र, संघात आयपीएल 2023 गाजवणारा फलंदाज रिंकू सिंग याच्या नावाचा समावेश नव्हता. याविषयी आता भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, जर या संघात तिलक वर्मा याला खालच्या फळीत फलंदाजीसाठी निवडले असेल, तर हा चुकीचा निर्णय आहे. त्याच्यानुसार, रिंकू खालच्या फळीत फलंदाजीसाठी चांगला पर्याय ठरू शकला असता.
रिंकू सिंग (Rinku Singh) याला भारतीय संघात संधी मिळाली नाहीये. विशेष म्हणजे, रिंकूने आयपीएल 2023 (IPL 2023) अनेक शानदार खेळी साकारल्या होत्या. यामध्ये एका षटकात पाच षटकार मारून सामना जिंकवण्याच्या कारनाम्याचाही समावेश होता. अशात आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने रिंकूचे नाव घेत म्हटले आहे की, खालच्या फळीत त्याची निवड केली जाऊ शकत होती.
तिलक वर्माच्या फलंदाजी क्रमाविषयी चोप्राची प्रतिक्रिया
आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओत चोप्रा म्हणाला की, “मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या आहेत. मला वाटत नाही की, संघ तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याविषयी विचार करत आहे. जर ते अशा खेळाडूचा शोध घेत होते, जो हार्दिक पंड्यानंतर फलंदाजी करू शकेल, तर रिंकू सिंग सर्वात चांगला पर्याय असता. तुम्ही कदाचित तिलक वर्माला खालच्या फळीत खेळवू इच्छित असाल. कारण, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यासाठी सर्वोत्तम जागा अव्वल 3मध्येच आहे.”
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे संघाचे नेतृत्व आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंची पहिल्यांदाच भारताच्या टी20 संघात निवड झाली आहे. यामध्ये तिलक वर्मा आणि यशस्वी जयसवाल यांच्या नावाचाही समावेश आहे. तिलक वर्मा याने आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळेच त्याला भारतीय संघात सामील करण्यात आले. त्याच्या बॅटमधून 11 सामन्यात 42.88च्या सरासरीने 343 धावांचा पाऊस पडला होता. यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश होता. (rinku singh could have been better choice in lower order than tilak verma wi vs ind says this former cricketer)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा झटका! टी20 मालिकेपूर्वीच स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, लगेच वाचा
करिअरच्या 100व्या कसोटीत स्मिथ फेल! ब्रॉडच्या घातक चेंडूवर ऑसी दिग्गज स्वस्तात बाद