भारतीय क्रिकेट संघाने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सने पराभव केला. असे असले, तरीही सगळी मैफील रिंकू सिंग या युवा विस्फोटक फलंदाजाने लुटली. भारतीय संघाची अचानक पडझड झाल्यानंतर रिंकू याने अत्यंत शांतचित्ताने फलंदाजी करत भारतीय संघाला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. त्याने आपल्या या खेळीनंतर आता एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 31 चेंडूत 55 धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंग यांनी खराब चेंडूंवर योग्य समाचार घेत फटकेबाजी केली. त्याने 14 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना त्याने षटकार ठोकला. मात्र, हा चेंडू नो बॉल असल्याने हा षटकार ग्राह्य धरला गेला नाही.
आपल्या या खेळीविषयी बोलताना तो म्हणाला, “मी आयपीएल दरम्यान माही भाईशी (एमएस धोनी) दोन वेळा बोललो होतो. दबावाच्या वेळी कसे शांत राहायचे हे त्यावेळी त्याने मला सांगितलेले. तीच गोष्ट मी कालच्या सामन्यात केली.” रिंकू हा आयपीएलपासून सातत्याने फिनिशनर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने जोश इंग्लिस याच्या वादळी 110 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 208 धावा चोपल्या. जोशव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ यानेही 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन (58) आणि सूर्यकुमार यादव (80) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी झाली. शेवटी रिंकू सिंगने 14 चेंडूत 22 धावांची खेळी साकारत त्याने सामना संपवला.
(Rinku Singh Praised MS Dhoni For His Finishing Skills Against Australia)
हेही वाचा-
T20 World Cup 2024: पाकिस्तानी माजी कर्णधाराची काळजी तर पाहा; म्हणतोय, ‘रोहित-विराटला टी20 वर्ल्डकपमध्ये…’
सूर्यासोबत काय चर्चा करून इशानने ऑस्ट्रेलियन स्पिनरला दिला चोप? स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘मला जोखिम…’
टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लोक मला सर्वात दुर्दैवी क्रिकेटर…’